Feeling Dehydrated Even After Drinking 3 Litres Of Water saam tv
लाईफस्टाईल

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

Why am I always dehydrated: अनेक जण दिवसाला २ ते ३ लिटर पाणी पितात, तरीही त्यांना कोरडे तोंड, थकवा आणि वारंवार तहान लागणे (Dehydration) यांसारखी लक्षणे जाणवतात. याचे कारण आहे की, 'फक्त पाणी पिणे' म्हणजे 'हायड्रेटेड राहणे' नव्हे.

Surabhi Jayashree Jagdish

मानवी जीवनासाठी पाणी हे आवश्यक आहे. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं, पचन सुधारून घेणं, रक्ताभिसरण आणि मेंदूचं कार्य नीट करणं या सगळ्या गोष्टी पाण्यामुळे होतात. तरीसुद्धा काही लोकांना दिवसातून तीन लिटर किंवा त्याहून जास्त पाणी प्यायल्यानंतही थकवा, भोवळ, घसा कोरडा पडणं किंवा डोकेदुखी अशी डिहायड्रेशनची लक्षणं दिसतात.

‘जस्टबी बाय निधी नाहटा’ या संस्थेच्या संस्थापक आणि न्यूट्रिशनिस्ट निधी नाहटा यांनी सांगितलं की, पाणी प्यायचं म्हणजे फक्त प्रमाण नाही तर शरीर ते किती शोषून घेतं आणि वापरतं हे महत्त्वाचं आहे. फक्त पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने जर इलेक्ट्रोलाइट्स आणि जीवनशैलीकडे लक्ष दिलं नाही तर उलट शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

हायड्रेशन म्हणजे फक्त पाणी नाही

शरीर हायड्रेट राहण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सची म्हणजेच सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांची मोठी भूमिका असते. हेच घटक पेशींमध्ये पाणी नीट वितरित होण्यास मदत करतात. त्यामुळे फक्त पाणी पिणं पुरेसं नसतं. जर इलेक्ट्रोलाइट्स भरून काढले नाहीत तर पाणी नीट शोषलं जात नाही आणि डिहायड्रेशनची समस्या कायम राहते.

भरपूर पाणी पिऊनही डिहायड्रेशन का होतं?

इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता

जास्त पाणी प्यायल्याने कधी कधी सोडियम कमी होतं ज्याला हायपोनाट्रेमिया म्हणतात. यामध्ये डोकेदुखी, गोंधळ, मळमळ आणि गंभीर अवस्थेत कोमामध्ये जाण्याचा धोका असतो.

उपाय- फक्त पाणी न पिता नारळपाणी, केळी, बिया, सुका मेवा आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.

खूप पटकन पाणी पिणं

आपली किडनी एका तासाला साधारणपणे एक लिटर पाणीच प्रोसेस करू शकतात. एकदम जास्त पाणी प्यायलं तर ते शरीरात शोषलं न जाता लघवीतून बाहेर टाकलं जातं.

उपाय- थोडं-थोडं करून दिवसभरात पाणी प्या.

आरोग्याशी संबंधित समस्या

डायबिटीज मेलिटस, डायबिटीज इन्सिपिडस किंवा अॅड्रिनल हार्मोनमधील असमतोल अशा काही आजारांमुळे वारंवार लघवी लागते आणि पाणी प्यायलं तरी डिहायड्रेशन होतं.

उपाय- सतत तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कॅफिन आणि मद्यपान

कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक्स किंवा दारू या सर्व पेयांमुळे शरीरातून पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जातं.

उपाय- प्रत्येक कप कॉफी किंवा दारूच्या ग्लाससोबत एक ग्लास पाणी जरूर प्या.

व्यायाम आणि घाम

वर्कआउट करताना किंवा उन्हात घाम आल्यामुळे फक्त पाणीच नाही तर इलेक्ट्रोलाइट्सही कमी होतात. अशावेळी फक्त पाणी प्यायलं तर शरीर अजूनही कोरडं वाटू शकतं.

उपाय- संत्री, टरबूज किंवा लिंबू, मीठ, मध टाकून बनवलेलं घरगुती इलेक्ट्रोलाइट ड्रिंक प्या

स्वतःहायड्रेट आहात का हे तपासण्याचे सोपे मार्ग

लघवी चाचणी

सलग तीन ग्लास पाणी प्यायल्यावर पुढच्या एका तासात जर फक्त एक ग्लास किंवा त्याहून कमी लघवी झाली तर तुम्ही डिहायड्रेट आहात.

रंग चाचणी

लघवी फिकट पिवळी असेल तर शरीर हायड्रेट आहे. गडद पिवळी किंवा अंबर रंग दिसल्यास डिहायड्रेशन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT