Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

Shreya Maskar

सकाळचा नाश्ता

सकाळी नाश्त्याला काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर दही मिसळ बनवा. ही रेसिपी बनवायला अगदी सिंपल आहे. तसेच ती लवकर बनते.

Dahi Misal | yandex

दही मिसळ

दही मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा-लसूण मसाला , लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Dahi Misal | yandex

टोमॅटो

दही मिसळ बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कांदा, टोमॅटो आणि आले-लसूण पेस्ट घालून गोल्डन फ्राय करा.

Tomato | yandex

शिजवलेली मटकी

यात उकडलेली मटकी ५ मिनिटे शिजवू‌न घ्या. तुम्ही यात सर्व चटपटीत मसाले टाका आणि ५ मिनिटे भाजीवर झाकण ठेवून द्या.

matki | yandex

फरसाण

आता एका बाउलमध्ये शिजवलेली मटकीची मिसळ टाका. वरून तुमच्या आवडीचा फरसाण टाका. तुम्ही यात डाळिंब देखील टाकू शकता.

Farsan | yandex

दही

आता एका बाउलमध्ये दही चांगले फेटून घ्या. मिसळसाठी थंड दहीचा वापर करा. यामुळे चव आणखी वाढते. मिसळवर तुमच्या आवडीनुसार दही टाका.

Curd | yandex

कोथिंबीर

शेवटी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर टाका. दही मिसळवर तुम्ही चिंचेची चटणी देखील टाकू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Coriander | yandex

बटर पाव

आता पॅनला बटर लावून मस्त पाव दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. आंबट-गोड दही मिसळसोबत पावचा आस्वाद घ्या.

Butter pav | yandex

NEXT : कारल्याची कडू चव विसरा अन् बनवा कुरकुरीत पकोडे, संध्याकाळची छोटी भूक मिनिटांत जाईल पळून

Karela Pakoda Recipe | saam tv
येथे क्लिक करा....