Karela Pakoda Recipe : कारल्याची कडू चव विसरा अन् बनवा कुरकुरीत पकोडे, संध्याकाळची छोटी भूक मिनिटांत जाईल पळून

Shreya Maskar

नाश्ता

तुम्हाला संध्याकाळी चहासोबत खायला चटपटीत पदार्थ हवा असेल तर कारल्याचे पकोडे एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे.

Karela Pakoda | yandex

कारल्याचे पकोडे

कारल्याचे पकोडे बनवण्यासाठी कारली, मीठ, पाणी, लिंबाचा रस, बेसन , तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, हळद, हिंग, लाल तिखट मसाला, तीळ इत्यादी साहित्य लागते

bitter gourd | yandex

कारल्याच्या बिया

कारल्याचे भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून घ्या. त्यानंतर कारल्याचे उभे काप करा. कारली कोमट पाण्यामध्ये धुवा.

bitter gourd | yandex

ट्रिक

बाऊलमध्ये पाणी, मीठ , लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. यात कारल्याचे काप बुडवून ठेवा. जेणेकरून सर्व कडवटपणा निघून जाईल.

Karela Pakoda | yandex

कॉर्नफ्लॉवर

दुसऱ्या बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, हळद, हिंग, लाल तिखट मसाला, तीळ सगळे पदार्थ छान मिक्स करा. यात थोडे पाणी मिक्स करून पेस्ट बनवा.

Cornflower | yandex

तेल

तयार पीठात कारली एक एक करून घोळवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून यात कारल्याचे कापे तळू‌न घ्या. कारली गोल्डन फ्राय तळून घ्या.

Oil | yandex

फायदे १

कारले चवीला कडू जरी असले तरी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उत्तम आहे.

Karela Pakoda | yandex

कारल्यातील पोषक घटक

कारल्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम आणि फायबर असते. वजन कमी करण्यासाठी कारले फायदेशीर आहे.

Karela Pakoda | yandex

NEXT : रोज 'हा' एक पदार्थ न विसरता खा; वजन झटपट होईल कमी, आठवड्याभरातच फरक दिसायला लागेल

Weight Loss | saam tv
येथे क्लिक करा...