Weight Loss : रोज 'हा' एक पदार्थ न विसरता खा; वजन झटपट होईल कमी, आठवड्याभरातच फरक दिसायला लागेल

Shreya Maskar

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी नियमित आहारात छोले सलाडचा समावेश करा. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे. तसेच खायचा चटपटीत देखील आहे.

Weight Loss | yandex

छोले सलाड

छोले सलाड बनवण्यासाठी छोले (चणे), कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, बीट, मक्याचे दाणे, लिंबाचा रस, चाट मसाला, काळीमिरी पावडर, मीठ, ऑलिव्ह ऑइल, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे इत्यादी साहित्य लागते.

chole salad | yandex

छोले

छोले सलाड बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये मीठ टाकून छोले शिजवून घ्या. त्यानंतर कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, बीट बारीक चिरून घ्या.

Chickpea | yandex

कांदा

मोठ्या बाउलमध्ये उकडलेले चणे आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, किसलेले गाजर आणि बीट घालून मिक्स करा. यात तुम्ही उकडलेले मक्याचे दाणे घाला.

Chickpea | yandex

लिंबाचा रस

त्यानंतर लिंबाचा रस, चाट मसाला, काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून सगळे व्यवस्थित मिक्स करा. जेणेकरून सर्व ठिकाणी मसाला चांगला लागेल.

Lemon juice | yandex

डाळिंबाचे दाणे

शेवटी यात बारीक हिरवीगार कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे मिक्स करा. तसेच ऑलिव्ह ऑइल घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा.

Pomegranate | yandex

शरीरासाठी फायदे

छोले सलाड भरपूर प्रथिने, फायबर आणि पौष्टिक तत्वांनी समृद्ध आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच शरीरातील साखर नियंत्रणात राहते.

Heart health | yandex

कोलेस्ट्रॉल कमी

जेवताना छोले सलाड खाल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तसेच यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

cholesterol | google

NEXT : भाजणी बनवायला वेळ नाही; मग १० मिनिटांत बनवा तांदळाची चकली, स्नॅक्ससाठी हेल्दी ऑप्शन

Tandalachi Chakli Recipe | saam tv
येथे क्लिक करा...