Tandalachi Chakli Recipe : भाजणी बनवायला वेळ नाही; मग १० मिनिटांत बनवा तांदळाची चकली, स्नॅक्ससाठी हेल्दी ऑप्शन

Shreya Maskar

ऑफिस स्नॅक्स

ऑफिस स्नॅक्समध्ये जंक फूड खाण्यापेक्षा घरी बनवलेले हेल्दी फूड खा. तांदळाची चकली हा स्नॅक्ससाठी बेस्ट ऑप्शन आहे. रेसिपी आताच नोट करा.

Office Snacks | yandex

तांदळाची चकली

तांदळाची चकली बनवण्यासाठी तांदूळ, भाजलेले चणे/ फुटाणे, तीळ, तिखट, मीठ, हिंग, हळद, तेल इत्यादी साहित्य लागते.

Rice Chakli | yandex

तांदूळ

तांदळाची चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुवून सुकवा आणि दळून आणा. त्यानंतर भाजलेले चणे मिक्समध्ये वाटून त्याची पावडर बनवा. पावडर नीट चाळून घ्या.

Rice | yandex

तांदळाचे पीठ

पॅनमध्ये तूप टाकून तांदळाचे पीठ कोरडे भाजून घ्या. पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये चण्याची पावडर, तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालून पुन्हा पीठ भिजवून घ्या.

Rice flour | yandex

थंड पाणी

चकलीचे पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. जेणेकरून कणिक चांगली मुरते. तसेच चकली कुरकुरीत होईल.

water | yandex

चकली पात्र

तयार कणिकेचा गोळा करून चकली पात्रात टाका. दुसऱ्या बाजूला एका प्लास्टिक पेपरवर तांदळाचे पीठ पसरवून त्यावर चकणी पाडून घ्या.

Rice Chakli | yandex

चकली तळा

पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात तांदळाची चकली तळून घ्या. तयार चकली हवाबंद डब्यात स्टोर करून घ्या.

Rice Chakli | yandex

टीप

चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळताना गरम तेलाचे मोहन घाला आणि पीठ गरम पाण्याने भिजवा.

Rice Chakli | yandex

Homemade Cake Recipe : गव्हाच्या पीठापासून बनवा बेकरी स्टाइल केक, फॉलो करा 'या' स्टेप्स

Homemade Cake Recipe | saam tv
येथे क्लिक करा