Shreya Maskar
गव्हाच्या पीठाचा केक बनवण्यासाठी दही, तेल, कणिक, गूळ, कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, दूध, पाणी इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
गव्हाच्या पीठाचा केक बनवण्यासाठी बाउलमध्ये वाटीभर दही , गुळाची पूड घालून मिक्स करा. सतत ढवळत रहा. गुठळ्या होणार नाही, याची काळजी घ्या.
छान मिश्रण एकजीव झाले की, त्यात तेल , गव्हाच्या पीठाचे मिश्रण घालून चांगली एकजीव करा. यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकून ५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
त्यानंतर मिश्रणात कोको पावडर घालून ढवळून घ्या. मिश्रण चांगले घट्ट होण्यासाठी यात दूध, तूप टाका आणि ढवळत रहा. गुठळ्या होणार नाही, याची काळजी घ्या.
त्यानंतर यात थोडे मीठ आणि तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम यांचे बारीक काप टाका. जेणेकरून केक खाताना आणखी स्वाद येईल.
आपण केक कुकरमध्ये बेक करणार असल्यामुळे कुकर आधी प्री-हीट करून घ्या. त्यानंतर कुकरच्या भांड्याला तूप लावून त्यात केकचे मिश्रण चांगले समप्रमाणात पसरवून घ्या.
केकवर चोको चिप्स, ड्रायफ्रूट्स टाका आणि केक २५-३० मिनिटे कुकरमध्ये बेक करायला ठेवा. गॅस कमी आचेवर ठेवायला विसरू नका.
शेवटी सुरीच्या मदतीने तपासून पाहा की केक शिजला की नाही, त्यानंतर तुम्ही केकवर वितळलेले चॉकलेट टाका आणि केकचा आस्वाद घ्या.