Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

Stomach cancer symptoms: पोटाचा कर्करोग हा एक प्राणघातक आजार ठरू शकतो, विशेषतः जर त्याचे निदान उशिरा झाले. याचे कारण असे की, सुरुवातीची लक्षणे ही अनेकदा सामान्य अपचन, गॅस किंवा पोटातील किरकोळ त्रासासारखी असतात.
Early signs of gastric cancer
Early signs of gastric cancersaam tv
Published On
Summary
  • पोटाचा कॅन्सर सुरुवातीला ओळखणे कठीण असते.

  • भूक न लागणे हे पोटाच्या कॅन्सरचे प्राथमिक लक्षण असू शकते.

  • सतत पोटदुखी किंवा पोट फुगणे गंभीर संकेत आहेत.

पोटाचा कॅन्सर म्हणजेच गॅस्ट्रिक कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्यामध्ये पोटाच्या आतील भागात कॅन्सरस पेशींची वाढ होते. दरवर्षी जगभरात लाखो लोकांना या आजारामुळे आपला जीव गमावतात. मुख्य समस्या म्हणजे या कॅन्सरची लक्षणं इतकी सामान्य असतात की सुरुवातीच्या टप्प्यावर ती सहज ओळखता येत नाहीत. त्यामुळे निदान उशिरा होतं आणि उपचारांमध्येही उशीर होतो.

Early signs of gastric cancer
Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

पोटाच्या कॅन्सरची कारणं

गॅस्ट्रिक कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये अनहेल्दी डाएट, सतत मसालेदार अन्नाचं सेवन, सिगारेट ओढणं, मद्यपान, लठ्ठपणा आणि काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया यांचा समावेश आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

भूक न लागणं

जर तुम्हाला सतत भूक न लागण्याची समस्या जाणवत असेल तर ती एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. जेव्हा तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा राहत नाही तेव्हा हे लक्षण पोटाच्या कॅन्सरची सुरूवात असू शकतं. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अशा वेळेस त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पोटदुखी

पोटदुखी विशेषतः नाभीच्या वरच्या भागात सतत वेदना जाणवणं किंवा जेवल्यानंतर पोट फुगणं हे देखील पोटाच्या कॅन्सरचे संकेत ठरू शकतात. ही लक्षणं दीर्घकाळ टिकत असतील तर ती केवळ अपचन नाही.

Early signs of gastric cancer
Liver cancer early symptoms: लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात मोठे ७ बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

छातीत जळजळ

सतत छातीत किंवा पोटात जळजळ होणं, अ‍ॅसिडिटी सारखं जाणवणं हे ही महत्त्वाचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी जळजळ कोणत्याही कारणांशिवाय वारंवार होत राहते तेव्हा त्यामागचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे.

शौचादरम्यान रक्त दिसून येणं

शौचादरम्यान रक्त दिसणं हे एक धोक्याचं लक्षण मानलं जातं. अनेकदा यामागे पाइल्स किंवा फिशर असल्याचा लोकांचा समज असतो. मात्र पण काही वेळेस हे कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे रक्त येण्याची तक्रार वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करून घ्या.

Early signs of gastric cancer
Early signs of lung cancer : फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात
Q

पोटाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण कोणते?

A

पोटाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण म्हणजे सतत भूक न लागणे, ज्याकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केले जाते.

Q

पोटदुखी हे कॅन्सरचे लक्षण कसे असू शकते?

A

नाभीच्या वरच्या भागात सतत वेदना किंवा जेवल्यानंतर पोट फुगणे हे पोटाच्या कॅन्सरचे संभाव्य लक्षण आहे, विशेषतः जर ते दीर्घकाळ टिकत असेल.

Q

छातीत जळजळ हे का गंभीर लक्षण आहे?

A

सतत छातीत किंवा पोटात जळजळ होणे, जे अॅसिडिटीसारखे वाटते पण कोणत्याही कारणाशिवाय वारंवार होते, ते पोटाच्या कॅन्सरचे संकेत असू शकते.

Q

शौचात रक्त येणे का धोकादायक आहे?

A

शौचात रक्त येणे हे पाइल्सपेक्षा पोटाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करणे आवश्यक आहे.

Q

पोटाच्या कॅन्सरची मुख्य कारणे कोणती?

A

पोटाच्या कॅन्सरची मुख्य कारणे म्हणजे अपुरा आहार, मसालेदार अन्न, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरियाचा संसर्ग.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com