अॅपलची एक खास गोष्ट म्हणजे डिव्हाईसला दीर्घकाळ पर्यंत अपडेट आणि वैशिष्ट्ये मिळत असतात. सध्या iOS 18.4 बीटा चाचणी सुरू असून एप्रिल २०२५ मध्ये सर्व पात्र युजर्ससाठी रिलिज होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक खास Apple Intelligence (AI) च्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. iOS 18.4 update मध्ये कोणती खास वैशिष्ट्ये आहेत, जाणून घेऊया.
१. प्राधान्य सूचना
नवीन iOS अपडेट जे फीचर्स घेऊन येत आहे, त्या लिस्टमध्ये प्रायॉरिटी नोटिफिकेशनचा देखील समावेश आहे. या Update मुळे यूजर्सच्या अशा नोटिफिकेशन Highlight होतील ज्या खूप महत्त्वाच्या आणि अर्जंट असतील.
उदा : या Feature मुळे संवेदनशील सुचना वरच्या बाजूला दिसतील. तसेच, लॉक- स्क्रीनवर एक छोटा सेक्शन दिला जाईल.
२. iPhone 15 Pro साठी व्हिज्युअल इंटेलिजेंस
आतापर्यंत फक्त iPhone 16 सीरीज मध्ये हे फिचर उपलब्ध होते. आणि आता ते iPhone 15 Series मध्ये देखील मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने कोणत्याही फोटोचे किंवा व्हिडिओचे विश्र्लेषण करण्यासाठी AI चा फायदा घेता येतो. हे Feature रिअल-टाईम ऑब्जेक्ट ओळख आणि संदर्भ सूचना व्यतिरिक्त चांगले एडिटिंग टील्सचा देखील समावेश आहे.
३. अॅप स्टोअर रिव्हू सारांश
कोणत्याही अॅपला मिळालेल्या रिव्यूच्या आधारे त्या अॅपला डाऊनलोड करायचे की नाही करायचे हा निर्णय घेणे सोप्पे नसते. खूपसारे रिव्हू वाचने ते समजून घेणे या Feature च्या मदतीने बंद होईल. हे फीचर सगळ्या रिव्हूंचा एक परिच्छेद बनवेल, त्या एकाच परिच्छेदात सामान्य मुद्दे किंवा तक्रारी एकत्रितपणे अधोरेखित करेल.
४. उत्तम भाषा सपोर्ट
भारतीय आणि जागतीक वापरकर्त्यांसाठी नवीन iSO अपडेट उत्तम भाषा घेऊन येऊ शकतं. हा फायदा Apple Intelligence सह उपलब्ध असेल आणि iSO 18.4 मध्ये आठ नवीन भाषांसाठी समर्थन उपलब्ध असेल. सध्या फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, Apple Intelligence आता ज्या नवीन भाषांमध्ये काम करेल त्या यादीत फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, जपान, कोरियन, चिनी आणि सिंगापूरी इंग्रजीचा समावेळ आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.