
Fact Check : 499 रुपयांत आयफोन!हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...मात्र, फक्त आणि फक्त 499 रुपयांत ऑनलाईन शॉपिंग साईटवर आय फोनची ऑफर देण्यात आलीय.आयफोन घ्यायचा म्हटलं तर 50 हजारांपासून ते लेटेस्ट आयफोन सव्वा लाख ते दीड लाखांना मिळतो...मात्र, खरंच 499 रुपये इतका स्वस्त आयफोन झालाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
'आयफोन 400 रुपये, 500 रुपये. एक्सक्लुझिव्ह ऑफर फक्त आजच्या दिवस.फोन बुक केल्यावर पुढच्या 10 मिनिटात डिलीव्हरी'
हा मेसेज पाहून अनेक जण ऑनलाईन शॉपिंग साईटवरून आयफोन बुक करतायत...मात्र, 10 मिनिटात आणि फक्त 500 रुपयांत आयफोन मिळतोय का? एवढ्या स्वस्तात आयफोनची ऑफर का दिली जातेय? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, आयफोन घ्यायची अनेकांची इच्छा आहे. मात्र, महागडा असल्याने बऱ्याच जणांना इच्छा असूनही आयफोन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी सुरू केली.
499 रुपयांत आयफोन मिळत असल्याचा दावा खोटा
ऑनलाईन शॉपिंग साईटवर स्वस्तात आयफोनची ऑफर नाही
फ्लिपकार्टसारखीच दिसणारी नकली साईट तयार केलीय
स्वस्तात आयफोन दाखवल्याने अनेकजण पैसे भरतात
पैसे भरूनही आयफोन न मिळता फसवणूक होते
आयफोनचं सोडा, तर साधा मोबाईलही आता 500 रुपयांना मिळणं कठीण...मात्र, काही भामटे लोकांना गंडवून पैसे उकळतायत. तसंच लिंकवर क्लिक केल्याने बँकेची माहिती सायबर चोरांना मिळते. त्यानंतर ते खातं खाली करतात...त्यामुळे कोणत्याही साईटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना सावधगिरी बाळगा. आमच्या पडताळणीत 499 रुपयांत आयफोन मिळत असल्याचा दावा असत्य ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.