Congress : काँग्रेसला पुण्यात आणखी एक धक्का, युवा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

Pune News : मागील काही दिवसांपासून माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आणखी एक शिलेदार काँग्रेस सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.
Congress in pune.
Congress in puneSaam Tv
Published On

पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. धंगेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. अशातच पुण्यातला आणखी एक नेता काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस युवा सरचिटणीस रोहन सुरवसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान काँग्रेसमधील काही नेते कार्यकर्त्यांना मोठे होण्याची संधी देत नाही असा आरोप करत काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोहन सुरवसे पाटील आणि अन्य पदाधिकारी लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार आणि रोहन सुरवसे यांच्या भेटीमुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचे लोक म्हणत आहेत. सुरवसे आणि इतर पदाधिकाऱ्यांची अजित पवार गटात प्रवेशाची वेळ निश्चित नसली तरी या संदर्भातील भेटीगाठींचे अंतिम टप्पे पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

Congress in pune.
Malvan News : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं भोवलं, मालवणमध्ये परप्रांतीयाच्या भंगार गोदामावर फिरवला बुलडोझर

अनेक वर्ष पक्षासाठी झटूनही संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे शहरातील वरिष्ठ नेते संघटन कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्यांकडून होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही पक्षात काँग्रेसमध्ये जुन्याच पदाधिकाऱ्यांनी संधी दिली जात आहे. यामुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांचे सहकारी काँग्रेसची वाट सोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

Congress in pune.
PM Kisan Samman Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com