Wednesday Horoscope Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : अडचणीतून वाट काढावी लागणार; वृश्चिकसह ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना अडचणीतून वाट काढावी लागणार आहे. तर काहींना सावध राहावे लागेल. वाचा बुधवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

पंचांग

बुधवार,१२ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष,कालाष्टमी,कालभैरव जयंती.

तिथी-अष्टमी २२|५९

रास-कर्क १८|३६ नं. सिंह

नक्षत्र-आश्लेषा

योग-शुक्लयोग

करण-बालव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - उच्च शिक्षणाशी निगडित काही मानस असेल तर आज त्या गोष्टी घडतील. घरातील वातावरण आनंदी आणि सुखकारक राहील. आईची विशेष काळजी घ्यावी.

वृषभ - शेजारी सहकार्य मिळेल. भावंड सौख्यच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. एखादी नवीन जबाबदारी अंगावर येऊन पडेल.

मिथुन - जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आज कुठेही साक्षीदार राहू नका. मनातील मनोकामना धनाशी निगडित असतील तर आज पूर्ण होतील.

कर्क - आपला प्रभाव इतरांवर राहील. वात्सल्य आणि प्रेमाने समोरच्या व्यक्तीमत्वाला आपण भारावून टाकाल. काहीतरी जगण्याची नवीन उमेद आज तुम्हाला लाभेल.

सिंह - अडचणीतून वाट काढत पुढे जावे लागेल. हॉस्पिटलाझेशन, बंधन योग याचे योग आहेत. विनाकारण कोणत्यातरी गोष्टीचा व्यय होईल.

कन्या - बौद्धिक क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. वक्तृत्वामधून लाभ होतील. परदेशी वार्तालाप होतील. दिवस चांगला आहे.

तूळ - कर्माचा लेखाजोखा आज अनुभवाल. न्यायकारक गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. समाजकारण, राजकारणामध्ये विशेष प्रगती राहील. दिवस चांगला आहे .

वृश्चिक - लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने आजचा दिवस आलेला दिसतो आहे. आपल्याला वेगळी ताकत आणि उमेद घेऊन पुढे जाल .आपल्याबरोबर इतरांचे कल्याण करण्याच्या मानस असेल. भाग्यकारक घटना घडतील .

धनु - दोलायमान मानोवस्था राहील. निर्णय घेताना थोडे अडचणीचे ठरेल. काट्यांची वाट आज भेदावी लागेल. दुपारनंतर महत्त्वाची कामे करावीत.

मकर - आयुष्यामध्ये कष्ट आणि मेहनत जास्त आहे. हे आज तुम्हाला जाणवेल. व्यवसायामध्ये जुन्या काही गोष्टींमधूनच प्रगती साधणार आहात. जोडीदाराची साथ मिळेल.

कुंभ - आज आपली सोशिकता वाढवावी लागेल. आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास संभवतो आहे. थोडासा दिलासा म्हणजे नोकरीच्या ठिकाणी योग्य ती दिशा आज आपल्याला सापडेल.

मीन - कोणतेही सोपस्कार न करता सहज सुलभ असा आजचा दिवस आहे. धर्माविषयी जागृती आपणास निर्माण होईल. दत्तगुरूंची कृपा राहील. दिवस उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : खासदार सुप्रिया सुळेंना बसला वाहतूक कोंडीचा फटका

Press Freedom Index : प्रेस स्वातंत्र्यात 180 देशांमध्ये भारत १५७ व्या क्रमांकावर, 6 अंकांनी घसरला

पालघर हादरले! एकाच ठिकाणी २ तरूणांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात, नेमकं झालं काय?

HSC Result 2026: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा? या एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Gautam Buddha Quotes: विचार न करता झटकन बोलता? थोडं थांबा..; गौतम बुद्धांचा सल्ला तुमचं आयुष्य बदलेल

SCROLL FOR NEXT