Gautam Buddha Quotes: विचार न करता झटकन बोलता? थोडं थांबा..; गौतम बुद्धांचा सल्ला तुमचं आयुष्य बदलेल

Mahatma Buddha Anmol Vichar : वैशाख पौर्णिमेला बुद्धांच्या शिकवणींचं स्मरण करत, लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करुन निर्णय घेण्याचं महत्व जाणून घ्या.
Gautam Buddha Quotes In Marathi
Mahatma Buddha Anmol Vichar google
Published On

वैशाख पौर्णिमेला खूप महत्वपूर्ण मानलं जातं. १ मे २०२६ रोजी वैशाख पौर्णिमा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी दिलेले संदेश आपण समजून घेतले पाहिजे. कारण बुद्धांनी विश्वाला शांतीचा मार्ग दाखवला. सध्याच्या धावपळीच्या जगात शांतता हरवत चालली आहे. जग खूप वेगाने पुढे जातयं. पण यासगळ्यात तुमच्या वागण्यावर तुमच्या मनावर आणि विचारांवर परिणाम होताना दिसत आहे.

कधी-कधी आयुष्यात असा टप्पा येतो की, आपल्याला आपला मार्ग सापडत नाही. जे काम पूर्वी आपण खूप सहजपणे करायचो तेच काम करायला आता खूप कठीण झालंय. पण जर तुम्ही धैर्याने त्या गोष्टीवर विचार करता, तेव्हा सगळ्यात कठीण प्रश्नही सोपे व्हायला लागतात. आपण एक चूक करतो ते म्हणजे एखाद्या गोष्टीवर विचार न करणे.

Gautam Buddha Quotes In Marathi
End Of Life Symptoms: भूक कमी अन्..., मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात होतात हे 5 त्रास; वेळीच घ्या जाणून

बुद्धांच्या मते, फक्त परिस्थिती बदलल्याने आयुष्यात यश मिळत नाहीतर, तुमच्या मनावर ताबा असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळवता येतात आणि त्यावर नियंत्रणही मिळवता येतं. त्यामुळे कधीही आयुष्यात कोणतीही वाईट-चांगली समस्या आली की, त्यावर लगेचच प्रतिक्रिया देणं टाळा. त्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करा. तोडगा काढा आणि परिस्थितीला सामोरे जा. ही एक शिकवण आयुष्यभर तुमच्या कामी येईल.

आयुष्यात संयम हा गुण महत्वाचा आहे. पण हा गुण येण्यासाठी तुम्ही त्यावर काम करणं गरजेचं आहे. जसं की, वादाच्या वेळेस शांत राहा किंवा लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. याचा तुम्ही सराव करा. याने तुमचा संयम वाढेल.

Gautam Buddha Quotes In Marathi
Maharashtra Din 2026 Wishes: जय जय महाराष्ट्र माझा! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com