End Of Life Symptoms: भूक कमी अन्..., मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात होतात हे 5 त्रास; वेळीच घ्या जाणून

Health Tips: मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यात अनेक बदल होतात. त्यामध्ये भूक कमी लागण्यापासून तुमच्या वागण्यातल्या बदलाचा समावेश असतो. पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
end of life symtoms
end of life symtomsgoogle
Published On

प्रत्येक व्यक्तीला माहित असतं की आपल्याला मृत्यू येणारच. काहींना गंभीर आजारामुळे मृत्यूला लवकर सामोरं जावं लागतं. कारण काही आजार हे जीवघेणे असतात. जेव्हा आपण एखाद्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात असतो तेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणात होणारे आजार आपल्या कुटुंबीयांसाठी भावनिकदृष्ठ्या कठीण ठरु शकतात.

जेव्हा उपचारांचा काहीच फरक तुमच्यावर जाणवत नाही, तेव्हा तुम्ही मृत्यूच्या मार्गावर असता असं स्पष्ट होतं. तज्ज्ञांच्या मते, या काळात काय घडू शकतं हे आधीच समजून घेतलंतर कुटुंबीयांना परिस्थितीला सामोरे जाणं थोडं सोपं जातं.

end of life symtoms
High Blood Pressure: तुमचा BP वाढलाय का? या ७ लक्षणांवरुन ओळखणं होईल सोपं

डॉ. जोसेफ शेगा, VITAS हेल्थकेअरचे चीफ मेडिकल ऑफिसर, सांगतात की शरीर हळूहळू थकायला किंवा कमी काम करायला लागलं की, खाण्यापिण्याची इच्छा कमी होते. बऱ्याचदा काही लोक पूर्णपणे अन्न सोडून देतात. जबरदस्ती करुनही मग लोक जेवत नाहीत. या काळात शरीर खूप थकलेलं वाटतं, हालचाल करता येत नाही. मग ती व्यक्ती उरलेला वेळ झोपेत किंवा आराम करण्यात घालवते. त्यांना जागं ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शांत आणि आरामदायी वातावरण तयार तरणं जास्त फायदेशीर ठरतं. काहीजण या टप्प्यात स्वतःमध्येच गुंतून जातात, आयुष्यात कमवलेल्या, गमवलेल्या सगळ्याचा आढावा घेतात.

जेव्हा आजार वाढतो तेव्हा वेदना, मळमळ किंवा अस्वस्थता वाढायला सुरुवात होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे संसर्गाचा धोका सुद्धा वाढतो. अशावेळी डॉक्टर आणि केअर टीम कुटुंबीयांना आवश्यक काळजी आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतात. तज्ज्ञांच्या मते या काळात सर्वात महत्वाचं म्हणडे रुग्णाला आधार, समजूत आणि सन्मान देणं गरजेचं आहे. त्यांच्या गरजांचा आदर करत त्यांच्यासोबत शांतपणे वेळ घालवणे हेच खरं आधाराचं काम ठरु शकतं.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

end of life symtoms
High Blood Pressure: तुमचा BP वाढलाय का? या ७ लक्षणांवरुन ओळखणं होईल सोपं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com