Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या वाढत्या ताणामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढत आहे.
सुरुवातीला ही समस्या शांतपणे वाढते, पण शरीर काही संकेत देत असतं. हे संकेत ओळखणं खूप गरजेचं आहे.
सकाळी उठल्यावर किंवा सतत डोकं दुखत असेल तर हे हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असतं.
डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्याने दृष्टी कमी होणं, धुसर दिसणं अशी लक्षणं आधीच जाणवतात.
छातीत दुखणं, दडपण किंवा तीव्र वेदना जाणवणं हे हृदयावर ताण येत असल्याचं लक्षण आहे.
कोणतंही हलकं काम करताना दम लागणं हे गंभीर लक्षण आहे.
मेंदूकडे रक्तपुरवाठा कमी झाल्यामुळे तुम्ही थकता, लक्षकेंद्रीत करु शकत नाही.
ह्रदय जोरात धडधडणे किंवा अचानक त्यामध्ये बदल जाणवणे हे हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असणे.
काहीवेळेस नाकातून रक्त येणं हे हाय ब्लड प्रेशरचे संकेत असू शकतात.