Press Freedom Index : प्रेस स्वातंत्र्यात 180 देशांमध्ये भारत १५७ व्या क्रमांकावर, 6 अंकांनी घसरला

press freedom index update : प्रेस स्वातंत्र्यात 180 देशांमध्ये भारत १५७ व्या क्रमांकावर पोहोचलाय. यंदा भारताची 6 अंकांनी घसरण झाली आहे.
press freedom
press freedom index update Saam tv
Published On
Summary

प्रेस फ्रिडम इंडेक्स अहवाल समोर

प्रेस स्वातंत्र्यांमध्ये पुन्हा भारताची घसरण

२०२५ साली भारत होता १५१ व्या स्थानावर

जागतिक प्रेस स्वातंत्र्यांमध्ये पुन्हा भारताची घसरण झाली आहे. प्रेस फ्रिडम इंडेक्सचा अहवालात १८० देशांत भारत थेट १५७ व्या पोहोचला आहे. प्रेस स्वातंत्र्याचा अहवाल 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'ने ३० एप्रिल रोजी जारी केलाय. २०२५ साली भारत १५१ व्या स्थानावर होता. यंदा क्रमवारीत ६ अंकांनी घसरण झाली आहे.

मागील २५ वर्षांत प्रेस स्वातंत्र्याच्या निर्देशकांत सहभागी १८० देशांच्या प्रेस स्वातंत्र्यांमध्ये घसरण वाढू लागल्याचे चित्र आहे. तर निम्म्याहून अधिक देशाचं प्रेस स्वातंत्र्य 'खूप गंभीर' श्रेणीत आहे. प्रेस स्वातंत्र्यात आघाडीवर नॉर्वे, नीदरलँड, एस्टोनिया, डेनमार्क आणि स्वीडन सारख्या देशाचा क्रमांक आहे. तर घसरणीत अरब, इराण, चीन , उत्तर कोरिया आणि इरिट्रिया या देशाचा समावेश आहे.

जगातील अनेक भागातील पत्रकारितेच्या स्थितीत घसरण पाहायला मिळत आहे. मोजक्या ठिकाणी सुधारणा झाल्या आहेत. १८० देशांपैकी १०० देशांच्या प्रेस स्वातंत्र्यामध्ये घसरण नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षभरात प्रेस स्वातंत्र्यात अधिक घसरण पाहायला मिळाली. अमेरिका देशाचं प्रेस स्वातंत्र्य ७ अंकांनी घसरलं आहे.

press freedom
press freedom index Saam tv

भारताचा शेजारी देश पाकिस्तान प्रेस स्वातंत्र्यात १५३ व्या स्थानावर आहे. भुटान १५०, नेपाळ ८७, श्रीलंका १३४ आणि बांगलादेश १५२ व्या स्थानावर आहे. तर चीन १७८ व्या स्थानावर आहे. भारत १५७ व्या स्थानावर आहे. फिलिस्तीनच्या एक स्थान खाली १५८ व्या स्थानावर आहे. तर २०२४ साली भारत १५९ व्या स्थानावर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com