

-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली आहे निमित्त होते माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या कोरेगाव शहरातील संपर्क कार्यालयाचे आणि तीन नवीन शाखांचे उद्घाटनाचे या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लावलेली हजेरी आणि विद्यमान आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोरेगाव मधील राजकीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कोणत्याही फलकावर किंवा बॅनरवर आमदार महेश शिंदे यांचा फोटो पाहायला मिळाला नाही.
बारवे कचरा प्रकल्पाला आग
अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दोन गाड्या दाखल.
अग्निशमन दलाकडून आग विजविण्याचे प्रयत्न सुरू ,आगीचे कारण अस्पष्ट
आज महाराष्ट्र व कामगार दिन असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जमिनीवरील दुवा असलेला प्रकाश दूध अर्थात लाईन मनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं बुलढाणा येथील वीज वितरण च्या जिल्हा मुख्य कार्यालयासमोर अनावरण करण्यात आलं. “लाईनमन हा खऱ्या अर्थाने प्रकाशदूत आहे. रात्रंदिवस, वादळ-वारा, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तो अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतो.
ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्याचे धक्कादायक प्रकरण धुळ्यात आले उघडकीस
एआयच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या कॉपी-बहाद्दरच्या धुळे शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
स्पर्धा परीक्षेमध्ये एआयच्या माध्यमातून संबंधित कॉपीबहाद्दर करत होता कॉपी
मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित लिपिक, शिपाई आणि वाहन चालक पदांच्या भरती परीक्षेदरम्यान 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा.
एक मे महाराष्ट्र दिनी पुणे मुंबईकर गावाकडे परतल्याने गर्दी
माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला सोडून शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेची आमदारकी स्वीकारल्यानंतर राज्यभरातील प्रहार कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे.
परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत बच्चू कडू यांच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला.
मराठी भाषेचा वारसा अभिमानानं जपण्यासाठी साम टीव्ही ने सुरू केलीय "मराठीच बोलू" ही एक लोकचळवळ. महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेसाठी गरज आहे मराठीतून संवाद साधण्याची. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक ठिकाणी मराठी दिनाच्या शुभेच्छांचे वर्षाव होताना दिसतायत पण ह्या शुभेच्छा एका दिवसापुरत्या मर्यादित राहू नयेत अशी तरुण मंडळींची अपेक्षा आहे.
मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकण्याचे धाडस एनसीईआरटीने केले आहे, पण त्यामागे कोण आहे,याचा शोध घेतला पाहिजे,अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.नकाशा बदलण्याची परवानगी एनसीआरटीने शिक्षण खात्याकडे अधिकृतपणे केलीच,तशी परवानगी मिळाल्यावरच नकाशा बदलला गेला आहे,
मंत्री नरहरी झिरवळ यांचा ताफा रोखून मडके फोडले
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ताफा सुरक्षित पुढे
भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या महिलांना घेऊन थेट पालकमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर पाण्याचे रिकामे मडके फोडून निषेध केला
भीषण पाणीटंचाईमुळे हिंगोली शहरात नागरिक संतप्त
ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या गाड्यांचा ताफा रोखून रिकामे मडके फोडले
पोलिसांनी तातडीने आंदोलकांना रोखल्याने ताफा सुरक्षित पुढे
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या नेतृत्वात हिंगोली शहरात पाण्यासाठी महिला संतप्त झाल्या होत्या
- नागपूरच्या राणी दुर्गवती चौकातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे...
- भरधाव टाटाएसने रस्त्याचा कडेला उभ्या असलेल्या बटाटा एसला जोरदार धडक दिली.. या धडकेत नुकतीच दुचाकीवरून उतरलेली महिला चिरडल्या गेली..,
- ही घटना सीसीटीव्ही कैद झाली असून एकच खळबळ उडालीय...
- चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती, अपघातां नंतर नागरिकांमध्ये संताप दिसून आला...
- पाचपावली पोलिसांची तातडीने कारवाई करत चालकासह वाहन ताब्यात
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने होरपळून निघालेल्या भंडारा जिल्ह्याला आज निसर्गाने मोठा दिलासा दिला.
आज दुपारच्या सुमारास पारा ४३ अंशांवर पोहोचल्याने रस्ते ओस पडले होते. मात्र, सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर बळीराजालाही मोठा आनंद झाला आहे.
चंद्रपूर वीज केंद्रातील 500 मेगावॉटचे एक युनिट दोन दिवसांपासून बंद पडले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बॉयलरमधील लीकेजमुळे हे युनिट बंद पडले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र दोन दिवस उलटूनही त्यात सुधार होऊ शकलेला नाही.
या दिवसात विजेची मागणी वाढत असताना पाचशे मेगावॉटची निर्मिती थांबल्याने विजेच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते, मराठी भाषेवरून राज ठाकरे यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे उत्तर
मागे काही दिवसाखाली राज ठाकरे यांच्या मनसे सैनिकांनी हिंदी भाषिकांना हिंदी शिकवण्यासाठी क्लास सुरू केले
राज ठाकरेंनी मराठी विषयी एकदा भूमिका स्पष्ट करावी तुम्ही कधी म्हणतात त्यांना मराठी कशाला शिकवायची ही बदलती भूमिका योग्य नाही
राज ठाकरेंनी मराठी बद्दल भूमिका स्पष्ट करावी म्हणजे जगभरात मराठी भाषा पोहोचेल
ज्या हिंदी भाषिक नेत्यांनी आमच्याकडे मुदत मागतली होती त्यासाठी आम्ही त्यांना 100 दिवसाची मुदत दिली आहे
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न कायम
नागरिकांना पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत असताना
दुसरीकडे नाहाटा कॉलेज परिसरातील सर्विस रोडवर पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं चित्र समोर आलं आहे
पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात
पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथे एका लग्नसोहळा असलेल्या सदनिकेला अचानक आग लागली आहे. डांगे चौक येथील गणेश मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सदनिकेला आज दुपारी अचानक आग लागल्याने, सदनिकेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं आहे.
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आजपासून डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलंय. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. या सेंटरमध्ये 5 डायलिसिस खाटांची सोय करण्यात आलीय. तीन शिफ्टमध्ये जवळपास 30 हून अधिक रूग्णांवर याठिकाणी मोफत डायलिसिसची सुविधा मिळणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोलड, इंदापुर, माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकएन्डमुळे सलग तीन दिवस आलेल्या सुटया आणि मे महिन्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक, मुंबईकर कोकणात निघाले आहेत. या वाहतुक कोंडीमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटक तसेच मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. मुंबई पुण्याला जोडणारी मिसलिंक आज खुली होत आहे. मात्र गेली 14 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा आणि सकारात्मक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने 6 वी ते 8 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचा घरटॅक्स कायमस्वरूपी माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र दिनी घेतला आहे.
यवतमाळच्या मारेगावमध्ये मार्डी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवला पुतळा
पुतळा बसविण्यावरून मारेगावमध्ये तणावाची परिस्थिती
पोलिस बंदोबस्त तैनात, शिवप्रेमीकडून पुतळा न हटवण्याची मागणी, तर प्रशासन पुतळा हटविण्यावर ठाम
प्रशासनाकडून अर्धाकृती पुतळा काढून नगर पंचायत सन्मानपूर्वकमध्ये ठेवण्यात आला, तहसीलदार निलवाड यांची माहिती..
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटापासून पारगावपर्यंत वाहतूक धीम्या गतीने
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीत वाढ
सकाळपासून मुंबईहून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहतूक खंडाळ्याच्या हद्दीत दिमागतीने सुरू
खंडाळा भुईंज आणि महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू
डोंबिवलीत धक्कादायक घटना समोर आलीये. डोंबिवली पश्चिम येथील नवसंपदा इमारतीसमोर एका तरुणाने वीज वितरण बॉक्समध्ये हात घालून आत्महत्या केली.
- आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अशोक खरातला ४ दिवसांची पोलीस कोठडी
- ४ मे पर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या आ. बच्चु कडू यांनी पक्ष प्रवेशानंतर मोठ विधान केल आहे. मी भाजप सोबत मॅच होऊ शकत नाही अस कडू म्हणालेत. याच वेळी त्यांनी दिव्यांग मंत्रालय, शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा उपस्थित करीत एकनाथ शिंदे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे; या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईनपद्धतीने 'स्व-गणना' पूर्ण केली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे पाटील आणि मराठा सेवकांनी आज बीड येथील पोलीस ग्राऊंडवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेतली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि व्हॅलिडीटी प्रक्रियेतील विलंब यावर या भेटीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
देशाच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'राष्ट्रीय जनगणनेला' आजपासून भंडारा जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. राज्याचे महसूल तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भंडाऱ्यात या मोहिमेचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. योगेश कदम यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून जनगणनेचा भंडाऱ्यातून श्रीगणेशा केला. जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यासाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाची जनगणना डिजिटल स्वरूपात होत असून, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. १ ते १५ मे पर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा केंद्र सरकारनं दिली असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन यावेळी योगेश कदम यांनी केलं आहे.
अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील बॉम्बे मशिनरी स्टोअर्सच्या गोडाऊनला आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात धुराचे काळे ढग बाहेर येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे प्रमाण वाढत असल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास अधिकारी, लोकप्रतिनिधी नागरिकांची उपस्थिती होती.
खासदार सुप्रिया सुळे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्या. खासदार सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार होत पुण्यातील पक्ष कार्यालयात झेंडावंदन करण्यात येणार होते. मात्र मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत.
दौंड मधील खोर येथील रंजना केसकर या महिलेचा शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मृत्यू झालेल्या या महिलेच्या घरी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भेट दिली. महिलेच्या मृत्यूनंतर तिची दोन मुले उघड्यावर पडली आहेत. मात्र अद्याप या मृत्यू प्रकरणाची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली नसल्याचे दिसत आहे .
प्रांतवार भाषा रचनेनुसार 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असून महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.. यावेळी आमदार मनोज कायंदे जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय अधिकारी गुलाबराव खरात उपस्थित होते.. यावेळी पोलीस होमगार्ड दलाच्या वतीने मानवंदना देऊन परेड संचालन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान विविध विभागाचे प्रमुख व नागरिक उपस्थित होते..
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिराच्या कोटालगत असलेल्या टपऱ्या, दुकानांचे अतिक्रमण प्रशासनाने पूर्णपणे हटवलय. मंदिर परिसरात दर्शन पथाची उभारणी केली जाणार असल्याने या कामासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमित दुकान हटवण्यात आली आहेत. मंदिरालगत टपरीधारकांची दुकाने अनेक वर्षांपासून होती. या दुकानांमुळे मंदिराभोवती येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती. मात्र आता त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन पथाची उभारणी केली जाणार असल्याने सर्व अतिक्रमण हटवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस अर्थात महाराष्ट्र दिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण सोहळा अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर पार पडला. मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केले. रायगड पोलिस दलातर्फे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाचा यावेळी गौरव करण्यात आला.
सलग सुट्ट्या आल्याने मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर मोठी गर्दी
प्रवाशांचे हाल
सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे,एक महिन्यांपासून आंधळी सह पाच गावांना आरफळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने दक्षिण आरफळ कॅनॉल कोरडा ठाक पडला आहे.परिणामी आंधळी गावासह आसपासची हजारो एकर शेती वाळू लागलेली आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे,मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी थेट आत्मदहनाची भूमिका घेतली आहे,येत्या दोन ते तीन दिवसात दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी न सोडल्यास पलूस तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.
नॅशनल ॲम्बुलन्स सर्विस( NAS) या राज्य सरकारच्या रुग्णवाहिका सेवेच्या चालकांचा गेल्या तीन ते चार महिन्यापासून संप सुरू असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील 90% रुग्णवाहिका या चालका विना धुळखात उभ्या आहेत. याचा फटका आज मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील गणेश किसन गावंडे या अत्यवस्थ रुग्णाला बसला.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २९ एप्रिल २०२६ रोजी हडपसर रेल्वे स्थानकावर उद्घाटन बनारस-पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले.
या अमृत भारत एक्सप्रेस सेवेच्या प्रारंभाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे, ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय आणि सुधारित कनेक्टिव्हिटी मिळेल.
- आर्थिक फसवणुकीच्या नवव्या गुन्ह्यात अशोक खरातला SIT ने घेतले आहे ताब्यात
- पुण्याच्या बिल्डरकडून तब्बल ५ कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात SIT च्या ताब्यात
- फसवणूक आणि जादूटोण्याच्या माध्यमातून खंडणीचा खरातवर आरोप
- मृत्यूची भीती दाखवत बिल्डरला गंडवल्याचा आरोप
- “आशीर्वाद” आणि “नकारात्मक ऊर्जा”च्या नावाखाली खरातने उकळले होते कोट्यवधी रुपये
संगमेश्वर एसटी स्टॅन्डकडून मुंबईच्या दिशेकडे 2 ते 3 किलोमीटरची रांग
पुलाचे सुरु असलेले काम आणि एकेरी वाहतूक सुरु असल्याने होतेय वाहतूक कोंडी
आंबेडकरी अनुयायांना आता चवदार तळ्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. समाज कल्याण विभागामार्फत 55 कोटी रूपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून या कामाला प्रारंभ झाला आहे. रायगडच्या महाड शहरातील चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर चवदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य शुद्धी करण्याचे काम केले जात आहे. यासाठी चवदार तळ्याचा तळ्यातील गाळ उपसरणे, बाग तयार करणे, रस्ते आदी काम केली जाणार आहेत. अमृतसरच्या धरतीवर पाणी शुध्दीकरणाचे हे काम केले जाणार असून आता चवदार तळे पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटक तसेच आंबेडकरी अनुयायांनी चवदार तळ्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
खडकवासला ते वारजे दरम्यान येणाऱ्या १६०० मिमी व्यासाची जलवाहिनीतून वारजे स्मशानभूमिजवळ अचानक गळती सुरू झाल्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, सुस, बाणेर, बालेवाडी, बोपोडी आदी परिसरात पाणी पुरवठा आज बंद राहाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
मलनि:सारण विभागातर्फे जायका प्रकल्पाचे काम सुरू असताना जलवाहिनीला धक्का लागल्याने जलवाहिनी खराब झाली आहे. जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतुन कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. महाराष्ट्र दिन आणि सलग तीन दिवस सुट्टयांमुळे मुंबईकर पर्यटनासाठी कोकणात निघाल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अर्धवट असून मुख्यरस्त्या ऐवजी खराब सर्व्हीस रोडचा वापर करावा लागत आहे. यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शिवाय बेशिस्त वाहन चालकांचा फटका देखील वाहतुकीला बसताना पहायला मिळत आहे.
खुनासारख्या गंभीर कलमाच्या गुन्ह्यातून कारागृहाबाहेर सुटल्यानंतर जल्लोष करण्यार्या आरोपींची पोलिसांनी रात्री पंढरपूर शहरातून धिंड काढली.
खूनाच्या आरोपीखाली अटकेत असलेला आरोपी काही दिवसांपूर्वी तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याची फटाक्याची आतषबाजी करत मिरवणूक काढली होती. यातून सार्वजनिक शांतता भंग व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पंढरपुरात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उत्तर पुणे जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हामुळे तापमान ४२ अंशांवर पोहोचले असून नागरिकांना उष्माघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.