horoscope today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : भगवान शंकराची कृपा होणार, तर काहींची जुनी गुंतवणूक फळाला येईल, वाचा १२ राशींचे राशीभविष्य

Horoscope Today in marathi : आज काही राशींच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा होणार आहे. तर काहींची जुनी गुंतवणूक फळाला येईल. तुमच्या नशिबात आज नेमकं काय लिहिलंय? वाचा

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,३ फेब्रुवारी २०२५,माघ शुक्लपक्ष.

तिथी- षष्ठी २८|३८

रास- मीन २३|१७ नं. मेष

नक्षत्र- रेवती

योग- साध्य

करण- कौलव

दिनविशेष- उत्तम दिवस

मेष - परदेशी जाण्याच्या संधी येतील. कामाचा व्याप वाढता राहील. कोणाची अपेक्षा न करता आपली कामे करत रहा. यश तुमचेच आहे.

वृषभ - जुनी गुंतवणूक फळाला येईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागण्याचा आजचा दिवस आहे. जुने मित्र भेटतील. नव्या गोष्टी रंगतील. दिवस आनंदी आहे.

मिथुन - समाजकारणामध्ये यश मिळेल. बौद्धिक गोष्टी आपल्या चातुर्याच्या बळावर सहज सोडवाल. आपला सल्ला इतरांना आवडेल कार्यक्षेत्र रुंदावेल.

कर्क- शिव उपासना विशेष फलदायी ठरेल. तीर्थयात्रा, मोठे प्रवास या दृष्टीने दिवस चांगला आहे. मन आनंदी आणि प्रसन्न राहील.

सिंह - सरकारी कामांमध्ये अडचणी निर्माण होतील. चुकीच्या मार्गाने जाऊ नका. भ्रष्टाचार, लाचलुचपत या गोष्टींमध्ये आपण नाहक गोवले जाण्याची आज शक्यता आहे.

कन्या- ठरवलेल्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील. व्यवसायामध्ये भागीदाराचा सल्ला आज महत्त्वाचा ठरेल. नवीन बैठक होईल. नव्या संधी निर्माण होतील.

तूळ - आजोळी प्रेम वाढेल. मामा, मावशी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे.

वृश्चिक -आज कुलस्वामिनीची उपासना करावी. शेअर्समध्ये चांगला फायदा होईल. मोठ्या गुंतवणुकीसाठी दिवस चांगला राहील. संतती सौख्य उत्तम राहील.

धनु - घर आणि जागा खरेदी विक्रीचे व्यवहार पार पडतील. दुभत्या जनावरांपासून फायदा होईल. शेती बागायतीची कामे मार्गी लागतील.

मकर - भावंडांचे विशेष सहकार्य लाभेल. छोटे प्रवास घडतील. दगदगीचा दिवस असला तरी दिवसाच्या शेवटी समाधानाची लहर जाणवेल.

कुंभ - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. अर्थार्जनासाठी मात्र दिवस चांगला आहे. नव्या उमेदीने कामाला लागाल.

मीन - आपले व्यक्तिमत्व उठून दिसेल. आपला इतरांवर प्रभाव असेल. आरोग्य चांगले राहील. आशादायी घटनांचा कालावधी आज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT