Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

PM Narendra Modi And Iran President Masoud Pezeshkian: इराण-इस्राइल युद्धादरम्यान भारतामध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. याबाबत आता पीएम मोदींनी मोठं पाऊल उचलले आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांनी फोन केला होता.
Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?
PM Narendra Modi And Iran President Masoud PezeshkianSaam Tv
Published On

Summary:

  • पीएम मोदी आणि इराण राष्ट्राध्यक्षांमध्ये तेल पुरवठ्यावर चर्चा

  • होर्मुझ सामुद्रधुनीत तणावामुळे तेल पुरवठ्याची चिंता

  • इराण-इस्राईल युद्धाचा भारतातील गॅस सिलिंडरवर परिणाम

  • भारताने तेल टँकरसाठी इराणशी केली चर्चा

इराण-इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. या युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारताला देखील या युद्धाची झळ बसली आहे. भारतामध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू लागला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या सर्व घडामोडीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता इंधनाचा प्रश्न सुटणार असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धादरम्यान इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन करत पहिल्यांदा थेट चर्चा केली. इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान पीएम मोदींनी भारतीयांच्या सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेनंतर पीएम मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दिली. भारतीय नागरिकांची सुरक्षा तसचं, तेल आणि वायूचा अखंड पुरवठा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे पीएम मोदींनी सांगितले.

पीएम मोदी यांनी या पोस्टमध्ये लिहिले की,‘मध्य पूर्वेतील गंभीर परिस्थितीवर इराणचे राष्टाध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली. या प्रदेशामधील वाढता तणाव, नागरिकांचे मृत्यू आणि पायाभूत सुविधांचे नुकसान याबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूचा अखंड पुरवठा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला आणि संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले.'

Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?
Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

पीएम मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये चर्चा अशावेळी झाली जेव्हा इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद केली आहे. सामुद्रधुनी हा एक धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचा सागरी मार्ग आहे. हा सागरी मार्ग जगातील कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या सुमारे पाचव्या भागाचा पुरवठा करते. दरम्यान, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पर्शियन आखात ते ओमानच्या आखाताला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून सुमारे २० तेल आणि वायू टँकरना जाण्याची परवानगी मिळावी यासाठी भारत इराणशी चर्चा करत आहे.

Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?
Iran-US War: आखातातील युद्ध थांबणार? इराणच्या 3 अटी अमेरिकेला मान्य?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com