Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Friday Horoscope in Marathi : आज संकष्टी चतुर्थी असून बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करण्याची शक्यता आहे. वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

शुक्रवार,१६ मे २०२५,वैशाख कृष्णपक्ष,

संकष्टी चतुर्थी.

तिथी- चतुर्थी २९|१४

रास- धनु

नक्षत्र- मूळ

योग- सिद्धयोग

करण-बवकरण

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आज संकष्टी चतुर्थी आहे. उपासनेला अतिशय उत्तम दिवस. गणेश उपासना फलदायी ठरेल. मनातील गोष्टी घडतील. भाग्यकारक घटना कानी येतील. दिवस चांगला आहे.

वृषभ - आपल्यामध्ये कितीही खुमखुमी किंवा शारीरिक ताकद असेल तरीही आज ठरवून केलेल्या गोष्टी तशाच घडणार नाहीत. विनाकारण वितुष्ट येतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मिथुन - काहीतरी नवीन ऊर्जा आणि नव्या गोष्टी घेऊन आज नव्याने प्रेरित व्हाल. व्यवसायाशी निगडित योग्य असे निर्णय होतील. जोडीदाराच्या मागण्या आज मान्य कराव्या लागतील.

कर्क - "नसती उठा ठेव कशाला" असे म्हणत म्हणत आपणच त्यामध्ये गोवले जाता. आज मात्र इतर कोणाच्याही गप्पांमध्ये खरंच रस घेऊ नका. आपण भले आपले काम झाले असाच हेतू ठेवला तर दिवस सत्कारणी लागेल.

सिंह - आज संकष्टी आहे. गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल. विद्येचा दाता असणारा गणपती विद्यार्थ्यांना उत्तम यश प्रदान करेल. आपल्या संततीची सुद्धा प्रगती झाल्यामुळे पालक हर्षित होतील.

कन्या - माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. आपली रास माहिती शोधून ज्ञान प्राप्त करणारी आहे. उच्च शिक्षणाशी निगडित चांगल्या गोष्टी घडतील. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल. दिवस संमिश्र आहे.

तूळ - बहिणीचे विशेष प्रेम आणि माया लाभेल. लहान प्रवास घडतील. कलेमधून लाभ होतील. वैश्य प्रवृत्तीची रास असल्यामुळे पैसा हे उद्दिष्ट ठेवून आज कामे कराल.

वृश्चिक - धनयोगाला दिवस चांगला आहे. लक्ष्मीचा वर्षाव होईल. मोठी गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. तिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होईल. दिवस चांगला आहे.

धनु - मनमौजी आणि मस्त रहावे असे वाटेल. स्वतःचा हुरुप टिकवून ठेवावा लागेल. एक वेगळा आत्मविश्वास स्वतःविषयी वाटेल. स्वतःच्या प्रेमात पडाल.

मकर - पैसा उधळण्यापेक्षा पैसा साठविणे आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला विनाकारण पैसे खर्च करायला आपल्याला आवडत नाही. पण आज अनाठही पैसे खर्च होतील. मानसिकता उद्विग्न राहील.

कुंभ - सून आणि जावई यांचे प्रेम लाभेल. न बोलता अनेक कामे सहज पार पडतील. मैत्रीमधूनही लाभ होतील. मोठे गुंतवणूक फायद्याची ठरलेली आज कळेल. प्रेमात मात्र मतभेद होतील.

मीन - समाजकार्यामध्ये विशेष रस घ्याल. राजकारणी लोकांपासून मात्र सावध राहा. काही वेळेला पडद्यामागची भूमिका घेतलेली बरी असते हे आज जाणवेल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

SCROLL FOR NEXT