Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : मेष आणि वृषभसह ५ राशीच्या लोकांसाठी शनिवार आनंदाचा ठरणार; तुमची रास कोणती?

Horoscope Today in Marathi : मेष आणि वृषभसह ५ राशीच्या लोकांसाठी शनिवार आनंदाचा जाणार आहे. या लोकांची अनेक महत्वाची कामे पूर्ण होणार आहे. वाचा तुमच्या नशिबात शनिवारी काय लिहिलंय?

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,४ जानेवारी २०२५,पौष शुक्लपक्ष.

तिथी- पंचमी २२|०२

रास- कुंभ

नक्षत्र-शततारका

योग- सिद्धि योग

करण- बवकरण

दिनविशेष- १० प.चांगला

मेष - मित्र-मैत्रिणींचा उत्तम सहवास लागेल महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडणार आहेत. दिवस अनेक लाभ घेऊन येणार आहे.

वृषभ - तुमचे कार्यक्षेत्र रुंदावणारे ठरणार आहे. समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा लाभेल. ठरवलेल्या गोष्टी नियोजित आणि वेळेत नक्कीच होतील.

मिथुन - गुरुकृपा म्हणजे काय? हे आज आपल्याला कळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल आणि मनात नसताना घडले म्हणून मन आनंदुन जाईल.

कर्क - कोणाच्याही सहकार्याची आज अपेक्षा करू नका. वाद विवाद मात्र शक्यतो टाळावेत. कधीकधी अडचणी या तुमच्या अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी येतात. तसा आजचा दिवस आहे.

सिंह -जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायामध्ये सुयश आहे. त्यामुळे मनासारख्या घटना घडल्यामुळे कामाचा नवीन उत्साह आणि जोम आज येऊन जाईल.

कन्या - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची मात्र दाट शक्यता दिसते आहे. "आपण भले आपले काम भले" हाच अजेंडा आज दिवसभरात राबवा.

तूळ - काहींचे वैचारिक परिवर्तन आज शक्य आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. संततीकडून सुवार्ता मिळतील. दिवस शुभ असेल.

वृश्चिक - तुमचे निर्णय आणि अंदाज एकूणच अचूक ठरणार आहेत. कामानिमित्त प्रवास होण्याचा संभव आहे. आज विशेष योग आहे काम हे प्राधान्य ठेवा आणि नेटाने कामाला जुंपा.

धनु - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने एखादे काम ठरवले असेल तर ते आज नक्की पूर्णत्वाला नेणार आहात. पराक्रम चांगला घडल्यामुळे मन सुखाऊन जाईल.

मकर - कोणाकडून येणे, कोणाला पैसे दिले असतील तर ते आज वसूल होतील. जुनी आणि वसूल झाल्यामुळे आवक चांगली व व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. गुंतवणूक साठी दिवस चांगला आहे.

कुंभ - आज तुम्ही हाती घेतलेले दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. दिवस चांगला आणि शुभ संकेत देणारा ठरणार आहे.

मीन - महत्वाची कामे आज करण्याचा विचार करत असाल तर आज ती नकोत. शक्यतो पुढेच ढकलावीत खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT