Vastu Tips: तुमच्या घरात वास्तूदोष आहे का, कसे ओळखाल?

Vastu Tips for Home: घरात काही गोष्टी घडल्यास त्याचा संबध घरातल्या सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जेशी बांधला जातो. परंतु घरात वास्तूदोष आहे का हे कसे कळणार? जाणून घ्या.
Vastu Tips
Vastu Tipsyandex
Published On

घरात काही गोष्टी घडल्यास त्याचा संबध घरातल्या सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जेशी बांधला जातो. जर घरामध्ये आर्थिक संकट निर्माण होत असेल किंवा कोणी सतत आजारी पडत असेल अनेकदा याचा संबध घरातल्या वास्तूशी केला जातो. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. त्याप्रमाणे जर तुमच्या घराची वास्तू चांगली नसेल तर घरात अनेक नकारात्मक गोष्टी घडतात. घरामध्ये आर्थिक संकट, घरगुती त्रास आणि मानसिक अशांतता निर्माण होते.

घरातले वातावरण शुद्ध आणि सकारात्मक करण्यासाठी वास्तूदोष काढून टाकणे गरजेचे आहे. परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे की तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही? आणि हे कसे कळणार? तर यासाठी आपल्याला काही संकेत मिळत असतात ज्याद्वारे हे ओळखले जाऊ शकते.वास्तुशास्त्रानुसार, ज्या घराला सतत आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्या घरात वास्तूमध्ये दोष असतो. याशिवाय तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्ही अनावश्यक खर्च करत असाल तर हे वास्तूदोषाचे चिन्ह आहे. याशिवाय घरातील कोणतीही व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा उपचार घेऊनही ती व्यक्ती बरी होत नसेल तर घरात वास्तूदोष असू शकतो.

Vastu Tips
Pre Diabetes : प्री डायबिटीज स्टेज म्हणजे काय? मधुमेह टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

वास्तूदोषाची चिन्ह

जर एखाद्या घरात वास्तूदोष आढळतो त्या घरातली लोक सतत मानसिक दबावात राहतात तसेच सतत नकारात्मक विचार करतात. याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडणं होतात आणि कटुता निर्माण होते. कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ लागतात. जर अशा घटना सातत्याने घडत असतील तर सर्वप्रथम घरातून वास्तूदोष दूर करण्यासाठी काही उपाय करा.

नकारात्मक विचारांचा प्रवेश

ज्या घरांमध्ये वास्तुदोष आहे. त्या घरातील व्यक्तींना मेहनत करूनही सामान्य यश मिळते किंवा अनेकदा अपयश हाती येते. वास्तुदोष असलेल्या लोकांच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात आणि ही लोक नेहमी चुकीच्या गोष्टींचा विचार करत राहतात. यामुळे कधीकधी तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून वास्तू दोष दूर करणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही तुमच्या घरात असे काही जाणवत असेल तर सर्वप्रथम तुमच्या घरातला वास्तूदोष दूर करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Vastu Tips
New Year Childrens Resolution 2025: नव्या वर्षात तुमच्या मुलांसाठी करा 'हे' संकल्प; आयुष्याला कलाटणी मिळणार

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com