
मधुमेह ही देशातील एक सामान्य आरोग्य समस्या बनली आहे. विशेषत: टाईप-2 मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आता हा आजार लहान वयातही होत आहे. जीवनशैलीतील बदल, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही त्याची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह होण्याआधी एखादी व्यक्ती मधुमेहपूर्व म्हणजेच प्री-डायबिटीज अवस्थेत जाते. या काळात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर मधुमेह टाळता येऊ शकतो.
प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त वाढते परंतु मधुमेहाच्या मर्यादेच्या पातळी पर्यंत पोहोचत नाही. तेव्हा या परिस्थितीला प्री डायबिटीज स्टेज असे म्हणतात. अशा परिस्थितीत तुम्हाला दररोज १० हजार पावले चालावे लागतील. तसेच दररोज १५ ते ३० मिनिटे योगासने करावे लागतील. आहारातील प्रथिने, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स वाढवून कार्ब्स कमी करावे लागतील.जर तुम्ही साखरयुक्त अन्न कमी केले आणि दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुम्ही मधुमेह टाळू शकता. मधुमेह होण्याचे नेमकं कारणे कोणती हे जाणून घ्या.
साखर आणि तेलापासून बनवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोकाही वाढतो. मानसिक दबावामुळेही मधुमेहाची समस्या वाढू शकते. तरुणांमध्ये अनेकदा असे दिसून येते की ते काम आणि अभ्यासाच्या बाबतीत तणावाखाली असतात, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. कुटुंबातील कोणाला टाईप २ मधुमेह असेल तर पुढच्या पिढीलाही या आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता वाढते.
टाइप 2 मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि आहार आहे. जंक फूड आणि साखरयुक्त अन्न शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते. ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो. मधुमेह होण्यापूर्वी शरीर प्री-डायबिटीज अवस्थेत असते. या काळात काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि काही गोष्टींचे पालन केेले तर मधुमेह टाळता येऊ शकतो.
आहारात भाज्या आणि फळांचा जास्तीत जास्त समावेश करा. जास्त साखर आणि तेल टाळा. दररोज 30 मिनिटांच्या शारीरिक हालचालींसह आपले शरीर निरोगी ठेवा. योग, ध्यान आणि चालणे यांसारख्या अॅक्टिव्हिटी करा यामुळे मानसिक शांतता मिळते. तुमचे वजन नियंत्रणात ठेवा, कारण जास्त वजन वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited By: Priyanka Mundinkeri