
नवीन वर्षात प्रत्येकाच्या मनात अनेक आशा आणि अपेक्षांचा उदय होतो. यावेळी आपल्या जीवनात सुधार आणण्यासाठी आपण स्वतःला अनेक वचने देत असतो. विविध संकल्प घेत असतो. यामध्ये आरोग्याशी संबधित अनेक संकल्प असतात. आरोग्य सुधारण्यासाठी आणि हेल्दी लाइफस्टाइलचा अवलंब करण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात एक उत्तम संधी आहे.आजच्या धावत्या काळात आपण सर्वात जास्त दुर्लक्ष आपल्या आरोग्याकडे करतो. खराब जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. आणि गंभीर आजारांना बळी पडतो. जर तुम्हीही या नवीन वर्षात हेल्दी आणि एनर्जेटीक राहण्याचा संकल्प घेत असाल तर डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करा.
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणीमध्ये लिंबाचा रस मिक्स करा. यामुळे पाचनसंस्था निरोगी राहते आण पचनक्रिया सुरळीत राहते. तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये याचा समावेश करा. तसेच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. आणि वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते.
बाहेरचे जेवण आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते हे आपल्या सर्वांना माहित आहे तरी देखील अनेक जण बाहेरचे जेवण आवडीने खातात. ज्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. या नवीन वर्षात संकल्प घ्या की तुम्ही बाहेरचे, फास्ट फूड जंक फूडच्या ऐवजी तुम्ही घरातले ताजे आणि पोषत तत्वाने भरलेले हेल्दी जेवण खाल. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.
अनेकांना भाज्या आणि फळे खायला आवडत नाही. परंतु हिरव्या भाज्या आणि फळांचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या जीवनात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करा. तसेच दिवसातून एक किंवा दोन फळे खा. यामध्ये असेलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
अधिक प्रमाणात मीठ किंवा साखर खाणं दोन्हीही शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुले दोन्हीही गोष्टी शक्य तेवढे कमी खा. यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि बल्ड प्रेशर देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच डायबिटीजचा धोका कमी होतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited By : Priyanka Mundinkeri