
नवीन वर्ष साजरा करण्यासाठी किंवा नवीन वर्षाची सुरुवात खास बनवण्यासाठी आपण अनेक प्लान करत असतो. या क्षणाला खास बनवण्यासाठी अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. किंवा पार्ट्यांचे आयोजन करतात. पण त्या बरोबरच नवीन वर्षात प्रत्येकाच्या मनात आशा आणि अपेक्षांचा उदय होतो. आरोग्य, करिअर आणि वैयक्तिक तसेच सार्वजनिक आयुष्यात काही महत्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आपण विविध संकल्प घेत असतो. यामध्ये वजन कमी करणे, नियमित लवकर उठणे, किंवा व्यायाम करणे अशे लोकप्रिय संकल्प देखील असतात. जर तुम्हीही या नवीन वर्षात स्वतःला काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर असा संकल्प घ्या जेणेकरुन तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील.
जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वस्थ आरोग्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी शारिरीक आरोग्यासह मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी दररोज ८ ते ९ तासांची नियमित झोप घ्या. संतुलित आहार घ्या. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. बाहेरचे खाणं टाळा. नियमित व्यायाम करा. मानसिक आरोग्यासाठी योगा आणि ध्यान करा. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या गोष्टींची सवयी लावा.
वेळ अमूल्य आहे. आपल्या जीवनात वेळेचे खूप महत्व आहे. परंतु काही जण आपापली कामे वेळेवर न करता त्यांना टाळतात. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत जातो. या नव्या वर्षात तुम्ही हा संकल्प करा की तुम्ही तुमच्या आयुष्यात वेळेचा सदुपयोग कराल. तुमची सर्व कामे वेळेवर कराल. महत्वाच्या कामांना प्राधान्य देत त्यांना वेळेवर पूर्ण कराल. तसेच बाकीची कामे सुद्धा वेळेवर कराल.
असे म्हणतात की आपले विचार आपल्याला घडवतात. जे आपण विचार करतो. तसे आपण वागतो. म्हणून जीवनात सकारात्मक मानसिकता असणे गरजेचे आहे. नकारात्मक मानसिकतेमुळे आपल्या हाती निराशा येते. त्यामुळे या नवीन वर्षात हा संकल्प करा की तुम्ही कोणत्याही परिस्थितित सकारात्मक विचार कराल. जीवनात कोणत्याही समस्या आल्या तरी निराश न होता त्यातून शिकण्याचा प्रयत्न कराल.अश्या प्रकारच्या सवयींचा अवलंब केलास आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील.
स्वतः ची काळजी घेणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न करणे. स्वतःच्या लाइफस्टाइलमध्ये बदल आणा. स्वतःला जाणून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या आवडीनिवडीला प्राधान्य द्या. केसांची काळजी घ्या, त्वचेची काळजी घ्या, स्कीन केअर रुटीन सुरु करा.तुम्हाला एखादी गोष्ट अॅक्टीव्हीटी म्हणून आवडत असेल तर ती करण्याचा प्रयत्न करा. तुमचा आवडता छंद जोपासा. तसेच जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर स्वतःसाठी वन डे ट्रीप प्लान करा.
Edited By: Priyanka Mundinkeri