New Year Camping: नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी प्लान करताय? मुंबईजवळ करा वन डे कॅम्पिंग ट्रीप

New Year Camping With Friends: अनेकांना न्यू इयरच्या निमित्ताने कॅम्पिंगला जायला आवडतं. जर तुम्हीही मुंबईजवळ वन डे कॅम्पिंग ट्रीपचा प्लान करत असाल तर या ठिकाणांबद्दल जाणून घ्या.
Camping
Campingyandex
Published On

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक जण फिरायला जाण्याचा प्लान करतात. तर काही जण वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन करत असतात. तसेच काहींना कॅम्पिंगला जाण्याची आवड असते. कॅम्पिंगची आवड असलेल्या लोकांना वेगवेळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. तुम्ही अनेकदा मुंबईजवळच्या कॅम्पिंगच्या ठिकाणांबद्दल ऐकला असाल.

न्यू इयरच्या निमित्ताने कॅम्पिंगला जाण्याची मज्जा वेगळी आहे. सरोवर किंवा समुद्राच्या किनारी किंवा डोंगराच्या उंचावर असणाऱ्या या कॅम्पमध्ये राहण्याचा अनुभव वेगळा आहे. मोकळे आकाश, निसर्गरम्य दृश्ये आणि शांत वातावरणात छोट्याश्या तंबूत आपल्या मित्र किंवा जोडीदारासह राहण्याचा आनंद तुम्ही कॅम्पिंगमध्ये घेऊ शकता. शहरापासून काही तासांवर कॅम्पिंगचे भरपूर पर्याय आहेत. येथे तुम्ही शहरी जीवनापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता. येथे तुम्ही तुमच्या पार्टनर किंवा मित्रांसोबत न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी कॅम्पिंगला जाऊ शकता. चला तर जाणून घेऊया मुंबईतील या ठिकाणांबद्दल.

लोणावळा

लोणावळा शहर हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात लोणावळ्यातील सर्व ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.ॲम्बी व्हॅली, पावना लेकसह लोणावळा हे धार्मिक आकर्षणे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये तिकोना किल्ला , ड्यूक नोज, लोहगड आणि राजमाची किल्ला यांचा देखील समावेश होतो. तसेच रॅपलिंग, पावना लेक कॅम्पिंग, तिकोना किल्ला हायकिंग, राजमाची किल्ल्यापर्यंत ट्रेकिंग आणि वेट आणि जॉय वॉटर स्लाइड्स हे देखील प्रसिद्ध आहे. पावना लेक कॅम्पिंगसाठी प्रसिद्धआहे. थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या निमित्ताने येथे अनेक कॅम्पिंगचे पर्याय उपलब्ध असतात.या कॅम्पिंगमध्ये तुम्हाला मासेमारी, कयाकिंग, बोटींग अशा साहसी उपक्रमाचा आनंद घेता येईल. तसेच येथे स्वादिष्ट पदार्थ आणि लाइव्ह म्युझिकचा आनंद घेता येईल.

इगतपुरी

पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले इगतपुरी हे महाराष्ट्र राज्यातील एक छोटेसे हिल स्टेशन आहे. इगतपुरी सह्याद्री पर्वतरांगांच्या काही उंच पर्वतरांगांनी वेढलेले आहे. हे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक आवडीचे ठिकाण आहे. मुंबई शहरापासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर असलेले इगतपुरीमध्ये तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. येथे तलावाच्या समोर उंच सपाट जागेवर तंबू लावलेले आहेत. रात्रीच्या वेळेस तुम्ही येथे बारबेक्यू आणि कॅम्पफायरचा आनंद घेऊ शकता.

खंडाळा

खंडाळा हे एक सुंदर ठिकाण आहे. हिरवीगार जंगले, धुके आणि धबधब्यांनी वेढलेले हे ठिकाण तुमचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन आणखी खास बनवेल. खंडाळा हे अॅडव्हेंचर स्पोर्टस आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, कयाकिंग, पेडल बोटिंग आणि झिपलायनिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय येथे तुम्ही कॅम्पफायरचाही आनंद घेऊ शकता.

Camping
New Year Resolution 2025: जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नव्या वर्षात करा 'हे' संकल्प

अलिबाग

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तुम्ही अलिबागमधील नागाव बीच, रेवदंडा बीच, मुरबाड बीच, काशीद बीच अलिबाग बीच, मांडवा बीच, आक्षी बीच आणि करसोली बीच या ठिकाणी होणाऱ्या कॅम्पिंगचा भाग होऊ शकता. तुम्हाला येथे तुमच्या बजेटमध्ये कॅम्पस मिळतील.या कॅम्पिंगमध्ये तुम्ही वाटरस्पोर्टसचा देखील आनंद घेऊ शकता. येथील नयनरम्य दृश्य तुमचा क्षण अविस्मरणीय बनवेल.याशिवाय या समुद्रकिनाऱ्याजवळील किल्ल्यांना देखील भेट देऊ शकता.

कर्जत

कर्जत हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले एक निसर्गरम्य शहर आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात नवीन वर्ष साजरा करायचा असल्यास तुम्ही येथे कॅम्पिंगला जाऊ शकता.येथे तुम्ही, स्टारगेझिंग, मैदानी खेळ, बोनफायर आणि इंडोर खेळांचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला या कॅम्पिंगपर्यंत पोहोचण्यासाठी जवळच्या स्पॅाट पासून पिक अणि ड्रॅापची सुविधा देखील मिळेल.

Edited By: Priyanka Mundinkeri

Camping
New Year Couple Destinations: पार्टनरसोबत नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करा खास, भारतातील 'या' ठिकाणांना द्या भेट

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com