Winter Health: हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Foods for Increase Immunity : हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते म्हणून आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
Immunity
Immunityyandex
Published On

हिवाळ्यात बदलत्या तापमानात झालेल्या घटमुळे शरीरावर परिणाम होतो. बदलत्या तापमानामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण या ऋतूमध्ये शरीराला अतिरिक्त उर्जा आणि रोगप्रतिकारशक्तीची आवश्यकता असते. या ऋतूमध्ये लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, त्यामुळे ताप, सर्दी, खोकला आणि इतर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात.

संतुलित आहार

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी आहारात हिरव्या भाज्या, चिकन, अंडी दूध, ड्राय फ्रुट्स आणि ताजी आणि हंगामी फळांचा समावेश करा. तसेच ज्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रोटीन असतात त्यांचा रोजच्या आहारत समावेश करा. याशिवाय तुम्ही आहारत सीड्सचाही समावेश करु शकता.

रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची?

संत्री, आवळा, पपई, शिमला मिरची आणि स्ट्रॉबेरी यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे दररोज या फळांचे सेवन करा. गाजर, रताळे आणि पालक यांसारख्या पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक पोषक घटक असतात त्यामुळे यांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच या पदार्थांमुळे रोगप्रतिकाशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत होते.

Immunity
New Year Camping: नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी प्लान करताय? मुंबईजवळ करा वन डे कॅम्पिंग ट्रीप

या व्यतिरिक्त हळद, आले, लसूण, मध, तुळस आणि लवंग यांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मध आणि आले यांचे एकत्र सेवन केल्यास खोकला कमी होतो. दुधात हळद मिसळून प्यायल्याने शरीरातील इन्फ्लेमेटरी कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हिवाळ्यात मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच आवडीचे म्युझिक ऐकल्याने तणाव कमी होतो . तसेच, तणावातून स्वतःला शक्य तेवढे आराम देण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहा.

कपड्यांचीही काळजी घ्या

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालणे आवश्यक आहे. तुम्ही बाहेर जात असाल तर तुमचे शरीर उबदार आणि ठेवण्यासाठी योग्य कपडे घाला. सर्दी टाळण्यासाठी मफलर, हातमोजे आणि उबदार शूज घाला, जेणेकरून शरीराचे तापमान राखता येईल. हे संक्रमण आणि रोग टाळण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला थंडी लागणार नाही आणि सर्दी, खोकला आणि ताप सारख्या आजारांना बळी पडणार नाही.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Priyanka Mundinkeri

Immunity
New Year Resolution: नव्या वर्षात करा नवी सुरुवात; स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी करा हे संकल्प, जीवन होईल आनंदी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com