
नवीन वर्षाचा पहिला दिवस सर्वांसाठी खूप खास आणि आशादायी असतो. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर गेल्या वर्षभरातील सर्व विशेष गोष्टी लक्षात ठेवतात, आणि त्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. तसेच आगामी वर्षात काहीतरी नवीन आणि चांगले करण्यासाठी स्वत: ला तयार करत असतात. म्हणूनच, बहुतेक लोक नवीन वर्षाच्या चांगल्या सुरुवातीसाठी वेगवेगळे संकल्प करतात. जे तुम्हाला वर्षभर प्रेरित करतात. नवीन वर्षाचे संकल्प केवळ मोठ्यांसाठीच नव्हे तर मुलांसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. नवीन वर्षाचे संकल्प त्यांना स्वतःबद्दल विचार करण्याची आणि समजून घेण्याची संधी देतात आणि एका प्रकारची चांगली सवय शिकतात. या नवीन वर्षात, पालक आपल्या मुलांना नवीन वर्षाचे संकल्प करण्यात मदत करू शकतात.
नवीन वर्षाचा संकल्प तयार करण्यासाठी आणि त्याचे महत्त्व त्यांना समजावून देण्यासाठी पालक मुलांना एक गंमतीशीर अॅक्टिव्हीटी म्हणून काही संकल्प करण्यासाठी सांगू शकतात. नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही मुलांना एक नवीन डायरी भेट द्या आणि त्यांना आपल्यासोबत बसवा आणि त्यांना प्रेमाने सर्वकाही समजावून सांगा.
सर्व प्रथम, मुलांना त्यांच्या डायरीमध्ये त्यांना ध्येय किंवा त्यांना जे साध्य करायचे आहे किंवा नवीन वर्षात त्यांना ज्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत ते लिहायला सांगा. तसेच त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल सर्व आवश्यक माहिती समजून सांगा. त्यांना मार्गदर्शन करा. मुलांना नवीन वर्षाचे संकल्प करण्याचे आणि पूर्ण करण्याचे महत्त्व समजावून सांगा आणि त्यांना त्यांच्या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी प्रेरित करा.
पालकांनी मुलांकडून नवीन वर्षात काही संकल्प करुन घ्यायला हवे. जेणेकरुन मुलांच्या चांगल्या संगोपनात नक्की मदत होईल. पालक नवीन वर्षात मुलांकडून काही संकल्प पूर्ण करुन घेऊ शकतात. जसे की, नवीन वर्षाच्या संकल्पात जुन्या वर्षातील वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट आणि बाहेरील खाद्यपदार्थ टाळले पाहिजे आणि दररोज आहारात भाज्या, दूध आणि फळांचा समावेश केला पाहिजे.
व्हिडिओ गेम, फोन, टीव्ही आणि इंटरनेटचा वापर मर्यादित करा आणि शक्य तितक्या शारीरिक हालचालींवर आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा. लहानांवर प्रेम करायला शिकवा आणि मोठ्यांचा आदर करायला शिकवा. इतर लोकांशी कधीही गैरवर्तन करणार नाही आणि त्यांच्या पालकांचा आदर करणार अशी गुण शिकवा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी अभ्यास करायला लावा. आणि दिवसभरातील सर्व चांगल्या वाईट घटना डायरीच्या पानावर लिहिण्याचा सराव करवून घ्या. असे केल्याने लिहिण्याची आणि वाचण्याची सवय लागते.आणि मुलांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
Edited By : Priyanka Mundinkeri