Horoscope in Marathi saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. तर काहींची चिंता वाढणार आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,७ जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष.

तिथी-द्वादशी २३|११

रास-वृश्चिक

नक्षत्र-अनुराधा

योग-शुभयोग

करण-बवकरण

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - महत्त्वाची कामे विनाकारण रखडण्याची शक्यता वाटते आहे. तापटपणाने घेतलेले निर्णय त्रासदायक ठरतील. मनोबल सुद्धा कमी राहील .आज शक्तीने नाही तरी युक्तीने काम करण्याची गरज आहे.

वृषभ -वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुद्धा यश मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. दिवस आनंदाचे उधाण घेऊन येणार आहे.

मिथुन - वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. शत्रूपिडा नाही. आध्यात्मिक प्रगती सुद्धा होईल. बोलण्यापेक्षा कृतींवर आज जोर दिल्यास दिवस यशदायक जाईल.

कर्क - मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. धनयोग उत्तम आहेत. शिव उपासना आज फलदायी ठरेल.

सिंह - गुंतवणूक फायद्याची ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये यश मिळेल. मातृसौख्य, वाहन सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला असेल.

तूळ - नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द आणि चिकाटीने परिस्थितीवर मात कराल. वैश्य प्रवृत्तीची असणारी आपली रास आहे. व्यवहाराला प्रथम प्राधान्य देऊन आज काम कराल.

वृश्चिक - तब्येतीच्या तक्रारी असतील तर आज संपुष्टात येतील. आरोग्य उत्तम राहील. इतरांवर तुमचा प्रभाव राहिल्यामुळे दिवस सकारात्मक जाईल .

धनु - काहींचा अध्यात्माकडे कल राहील. पण त्याचबरोबर खर्चाचे पण प्रमाण वाढेल असेल. काही कारणांनी मानसिक बल कमी होत असेल तर उपासना वाढवावी.

मकर - प्रियजनांच्या सहवासामुळे दिवसाचा आनंद लुटाल. महत्वाच्या गाठीभेटी सुद्धा पार पडतील. जवळचे लोक भेटल्यामुळे आनंदात भर पडेल.

कुंभ - तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कार्यातही सुयश लाभणार आहे. ठरवाल ते होण्याचा आजचा दिवस आहे.

मीन - गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता कामास्वरूपात मिळेल. दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरेल.दिवस भाग्यकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND Vs UAE : भारताने यूएईचा धुव्वा उडवला, सामना २७ चेंडूंमध्ये संपवला; टीम इंडियाची विजयी सुरुवात

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील २ आरोपींचा जामीन न्यायालयाने नाकारला

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

SCROLL FOR NEXT