Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : जुनाट विकार डोके वर काढणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल तब्येतीची काळजी

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचे जुनाट विकार डोके वर काढतील. तर काहींना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

Anjali Potdar

पंचांग

सोमवार,८ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी-चतुर्थी १६|०४

रास-कर्क

नक्षत्र-पुष्य

योग-ब्रह्मा

करण-बालव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - घरामध्ये पाहुण्यांची लगबग होईल. आदरातिथ्यामध्ये मन व्यस्त असेल. कौटुंबिक सौख्याला दिवस चांगला आहे. मातृ सुखाला उधाण येईल. शेती व्यवसायात प्रगती होईल.

वृषभ - साधेपणाने जग जिंकता येते हे आपल्याकडे बघून कळते. आज काही विशेष पुरस्कार, सन्मान आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमामध्ये लाभ होतील. आनंदी दिवस आहे.

मिथुन - विविध पदार्थ खाण्याची आज लयलूट असेल. स्नेहभोजनाचे योग येतील. कौटुंबिक वातावरण अल्हाददायी असेल. वक्तृत्वाने, वाणीने सुखाची नवी भिंत उभी कराल. बँक व्यवहारात मात्र दक्षता घ्यावी.

कर्क - तसे पाहायला गेले तर आपल्या राशीला आनंदाला कोणतेही कारण लागत नाही.सहज साध्या गोष्टीत आपण आनंदी असतात. आज अजून स्वमग्न असण्याचा दिवस आहे. एक वेगळा प्रभाव आपला इतरांवर राहील. मान देणे घेणे दोन्हीही आज चांगले राहील.

सिंह - मोठी स्वप्न बघायला काहीच हरकत नाही असे आपल्या राशीचे म्हणणे असते. परदेशाची निगडित व्यवहार तसेच व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय आज होतील. अपयश आले तरी ती यशाची पहिली पायरी आहे, हे म्हणून पुढे जावे लागेल.

कन्या - मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात वेळ कसा जातो कळत नाही. आपलेच लोक कामी येतात हे आज जाणवेल. जुन्या गुंतवणुकी मधून फायदा होणार आहे. प्रेमामध्ये "थोडे तुझे माझे" होण्याची शक्यता आहे.

तूळ - प्रवासामध्ये प्रगती होईल. आपण केलेल्या कामाची योग्य ती पावती आज मिळेल. कार्यक्षेत्र रुंदावणारे राहणार आहे. बिनधास्तपणे नवीन जबाबदाऱ्या पेलायला आज तुम्ही तयार आहात त्याचे स्वागत करा.

वृश्चिक - कुलस्वामिनीची उपासनेने आपल्याला न ठरवता काही गोष्टी सहज होतील. मोठे प्रवास होतील. नातवंड सौख्यामध्ये दिवस व्यस्त राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या संधी येतील.

धनु - तब्येतीची काळजी घ्यावी. एकट्याने धावपळ, दगदग आज होणार आहे. कोणाच्याही अमिषाला भुलून आज कामे करणे टाळा. काही गोष्टी एकट्यालाच प्रगती देतात हे लक्षात ठेवा.

मकर - आपण कायमच सचोटी चिकाटी आणि जिद्दीने काम करत आहात. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्र मंत्र अवलंब करणे, व्यावसायिक जोडीदाराचे योग्य ते सहकार्य आज तुम्हाला मिळणार आहे. दिवस चांगला आहे .

कुंभ - मानसिक त्रास तणाव, सांधेदुखी, जुनाट विकार हे आज डोके वर काढतील. कामांमध्ये दिवस व्यस्त ठेवणे जास्त बरे राहील. संशोधनात्मक कार्यात विशेष प्रगती होईल. दिवस संमिश्र राहील.

मीन - काहीतरी नवे शिकण्याची इच्छा आज होईल. आपल्या एकूण सर्व गोष्टीत सृजनशीलता वाढेल. मन स्वस्थ चांगले असेल. दत्तगुरूंचे विशेष कृपा आशिर्वाद आज आपल्यावर असल्यामुळे धनयोग सुद्धा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Tanker: भारताला मोठा दिलासा! ईराणी 'चक्रव्यूह'ला भेदून मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पाहा VIDEO

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT