Ganesh Chaturthi 2025 Rashifal saam tv
राशिभविष्य

Ganesh Chaturthi 2025: आज गणेश चतुर्थीला बनलेत 5 शुभ योग; 4 राशींना लागणार लॉटरी, बँक बॅलन्स वाढणार

Ganesh Chaturthi 2025 Rashifal: आज सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) हा दिवस केवळ धार्मिकच नाही, तर ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज आहे गणेश चतुर्थी...संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात ती साजरी केली जाणार आहे. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीला एक-दोन नाही तर तब्बल ५ शुभ योग एकत्र जुळून आले आहेत. असा संयोग फार क्वचित घडतो. त्यामुळे या वर्षीची गणेश चतुर्थी अधिक खास ठरणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शुभ, शुक्ल, प्रीती आणि रवि असे योग पूर्ण दिवस राहणार आहेत. याशिवाय कर्क राशीत बुध आणि शुक्र एकत्र येत असल्याने लक्ष्मी-नारायण नावाचा राजयोगही तयार झाला आहे. या शुभ योगांचा परिणाम विशेषतः चार राशींवर अधिक प्रभावी दिसून येणार आहे. यामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना यंदा नशिबाचा पूर्ण साथ मिळणार आहे. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून चांगला फायदा होणार आहे. प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक गोड होणार आहे. मुलांकडून आनंद आणि समाधान मिळणार आहे. पूर्वी कुठे गुंतवणूक केली असेल तर तिचा लाभ आता मिळणार आहे.

कर्क रास

कर्क राशीत लक्ष्मी-नारायण योग बनल्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष धनलाभ होणार आहे. राजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तींना उच्च पद मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ या काळात नक्की मिळू शकतं. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. शेअर बाजारातूनही चांगला नफा होऊ शकतो.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना एखादी मोठी आनंदवार्ता मिळू शकणार आहे. गणपतीची कृपा असल्याने मालमत्तेतून लाभ मिळणार आहे. न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होणार आहे. सासरकडून मौल्यवान भेट मिळू शकणार आहे. या काळात तुमचं आरोग्यही चांगले राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांना या काळात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. घरात नवा पाहुणा येऊ शकणार आहे. अविवाहितांना चांगले विवाह प्रस्ताव मिळू शकतात. बेरोजगारांसाठी नोकरीची संधी निर्माण होणार आहे. समजूतदारपणे घेतलेले निर्णय योग्य ठरणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT