Marathi Serial saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Serial : सूडाची प्रेम कहाणी घेऊन 'ती' आली...; नव्या मराठी मालिकेची सोशल मीडियावर तुफान चर्चा, VIDEO

Zee Marathi New Serial : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणखी एक मालिका येत आहे. या मालिकेत सूडाची प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. मालिका कधीपासून सुरू होणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी नवीन मालिकेची घोषणा

मालिकेत सूडाची प्रेम कहाणी पाहायला मिळणार

प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक नव्या मालिका सुरू होताना दिसत आहे. अशात झी मराठी वाहिनीने देखील आपल्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या नव्याकोऱ्या मालिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. झी मराठी वाहिनीने बहुप्रतीक्षित 'इच्छाधारी नागीण' या मालिकेची घोषणा करून मु्ख्य अभिनेत्रीचा चेहरा उघड केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये 'इच्छाधारी नागीण' या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत होते. अलिकडेच 'इच्छाधारी नागीण' मालिकेचा शुभारंभ होऊन सेटवर मुहूर्त पूजा झाली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता 'इच्छाधारी नागीण' या मालिकेचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात प्रसिद्ध अभिनेत्री गौरी शेळगावकर नागीणीच्या रुपात पाहायला मिळत आहे. गौरीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. 'सफल होगी तेरी आराधना', 'बींदणी' या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.

'इच्छाधारी नागीण' या मालिकेच्या प्रोमो व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "नागलोकाची अद्भूत राणी, रूपाने मोहिनी... लवकरच अवतरणार भूतलावर पूर्ण करण्या तिच्या सूडाची प्रेम कहाणी! इच्छाधारी नागीण - सूडाची प्रेमगाथा..." या प्रोमो व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. व्हिडीओत अभिनेत्री नागीणचे रुप घेताना दिसत आहे. अद्याप मालिकेची रिलीज डेट जाहीर झाली नाही. मात्र चाहते उत्सुकतेने शोची वाट पाहत आहेत.

आतापर्यंत हिंदी टिव्ही इंडस्ट्रीत 'नागीण' या मालिकेचे सात भाग पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकता कपूरच्या मालिकांनी प्रेक्षकांना वेड लावले. आजवर नागिनच्या भूमिकेत अनेक प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री झळकल्या आहेत. यात मौनी रॉय, सुरभि ज्योति, अनिता हसनंदानी, निया शर्मा, जैस्मिन भसीन, सुरभि चंदना , प्रियंका चाहर आणि तेजस्वी प्रकाश यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT