Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक; ५० हजाराचं घड्याळ निघालं नकली, VIDEO शेअर करत सांगितला धक्कादायक प्रकार

Bollywood Actor Was Defrauded Online : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून ॲपल वॉच नकली निघाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Bollywood Actor Was Defrauded Online
Famous ActorSAAM TV
Published On
Summary

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक

ऑनलाइन मागवलेले ॲपल वॉच नकली निघाले

वॉचची किंमत जवळपास 50,000 रुपये होती

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास (Vir Das) सोबत ऑनलाइन फसवणूक झाली आहे. त्याने या संबंधित सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली आहे. वीर दासने एका ई-कॉमर्स वेबसाइट वरून जवळपास ५०,००० रुपयांचे 'ॲपल वॉच'च (Apple Watch) मागवले होते. मात्र त्याला 'ॲपल वॉच'ची बनावट कॉपी (counterfeit) देण्यात आली. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून वीर दासने सांगितले की, एका शूटिंगसाठी त्याला घाईघाईने 'ॲपल वॉच'ची गरज होती, म्हणून त्याने ई-कॉमर्स वेबसाइट वरून घड्याळ मागवले. पण ते घड्याळ बनावट असल्याचा आरोप अभिनेत्याने केला. घड्याळाची झलक व्हिडीओत दिसत आहे. तसेच वीर दासने कस्टमर केयरशी संपर्क साधला, मात्र त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

वीर दासची पोस्ट

"ठीक आहे. मी चुकीचा आहे का? सर्व ॲपल वॉचेस अशीच दिसतात की ई-कॉमर्स वेबसाइट चिनी बनावटीच्या वस्तू विकून काहीतरी गडबड करत आहेत? तसेही, त्यांच्या कस्टमर केयरने फोनवर सांगितले की, ते यात काहीच करू शकत नाहीत. हे पूर्णपणे फसवणुकीचे प्रकरण आहे. आम्हाला शूटिंगसाठी याची तातडीने गरज होती आणि त्यांनी आमच्याकडून ५० हजार रुपये आकारले..." त्याने या पोस्टमध्ये ई-कॉमर्स वेबसाइटला टॅग करून स्पष्टीकरण मागितले.

वीर दासची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइटने पोस्टला उत्तर देत लिहिलं की, "हे आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद वीर, आणि तुमच्या पुढील सहकार्यासाठी. आम्हाला आशा आहे की, बदली आणि पिक-अप खूप त्रासदायक नव्हते. काय चूक झाली ते आम्ही तपासत आहोत...असे पुन्हा घडू नये यासाठी आम्ही योग्य ती कारवाई करू..." वीर दासने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत.

Bollywood Actor Was Defrauded Online
Sanchita Ugale Death : संचिता उगलेच्या आत्महत्येचे सुशांत सिंह राजपूतशी कनेक्शन? अभिनेत्रीच्या भावाचा खळबळजनक आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com