Nashik Kumbhmela : नाशिक कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा; महंत महादेव दास महाराज यांची घोषणा

Shirdi News : संत असून निंदा करत असेल तर हिंदू समाजाने विचार करावा ते खरंच संत आहेत की नाही? अशा शब्दात महंत महादेवदास महाराज यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संत युवराज यांना खडेबोल सुनावले
Shirdi News
Shirdi NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : नाशिक येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यात वेगवेगळे आखाडे राहणार असून नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु करणार असल्याची घोषणा उत्तराखंड येथिल जोगेश्वरधामचे महंत महादेव दास महाराज यांनी आज शिर्डी येथे आले असताना केली आहे. या आखाड्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

महंत महादेव महाराज यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी साईबाबांच्या नावाने सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान महंत महादेव दास महाराज हे भगवान शंकराचे निस्सिम भक्त असून त्यांनी अनेक वर्ष हिमालयातील विविध गुहांमध्ये तपसाधना केलेली आहे. उत्तराखंड येथील जोगेश्वरधाम येथे त्यांची आध्यात्मिक साधना आजही सुरू आहे. 

Shirdi News
Madhuri Elephant : माधुरी हत्तीला गुजरातला हलविल्याचा निषेध; जैन समाजाकडून आंदोलन, रिलायन्स उत्पादनावर बहिष्काराचा केला ठराव

आखाड्यातून सनातन धर्माचे विचार पोहचविण्याचे कार्य 

महंत महादेव दास महाराज यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि साईबाबांची पुजाविधी तसेच दैनंदिन कार्यक्रमांचे कौतुक केले. तर २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आखाड्याच्या माध्यमातून सनातन धर्माचे विचार लोकांपर्यंत पोहचण्याचे कार्य करणार आहे. सनातन हिंदू धर्माला अपेक्षित गोरगरिबांची सेवा करण्याचे काम साईबाबांनी केले. कुंभमेळ्यातील हा आखाडा देशातील कोट्यवधी साईभक्तांचा आखाडा असेल. 

Shirdi News
Raigad Cyber Crime : डिलीटल अरेस्टची भीती दाखवून लुबाडणूक; रायगड पोलिसांनी ११ आरोपींना ठोकल्‍या बेड्या

अवमानजनक वक्तव्य करतात त्यांनी शिर्डीत यावे 

साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संत युवराज यांच्यावर देखील महंत महादेवदास महाराज यांनी निशाणा साधला. जे लोक साईबाबांविषयी अवमानजनक वक्तव्य करतात त्यांनी शिर्डीला यावे. बाबांची पूजा आणि आरती सनातन हिंदू रिती रिवाजाप्रमाणे होते हे त्यांनी बघावे. युवराज हे कोणत्या आखाड्याचे महंत आहेत? आणि त्यांना कुणी महंत बनवले? आम्ही अशा तथाकथित आखाड्यांना मानत नाही. आम्ही सनातन धर्माच्या मूल्य सिद्धांतावर चालणाऱ्या आखाड्यांना मानतो. कुणी स्वतःला संत म्हणत असेल तर तो दुसऱ्यांची निंदा कशी करू शकतो? सनातन धर्मात निंदा करणे पाप आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com