Madhuri Elephant : माधुरी हत्तीला गुजरातला हलविल्याचा निषेध; जैन समाजाकडून आंदोलन, रिलायन्स उत्पादनावर बहिष्काराचा केला ठराव

Sangli News : पेटा प्राणी संरक्षण संस्थेने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात आला. माधुरीसारख्या धार्मिक व भावनिक श्रद्धेचा भाग असलेल्या हत्तीबाबत असा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत समाजनेत्यांनी व्यक्त केले.
Madhuri Elephant
Madhuri ElephantSaam tv
Published On

सांगली : नांदणी येथील श्री जिनसेन मठामधील 'माधुरी' हत्तीला जामनगर (गुजरात) येथील वनतारा उद्यानामध्ये हलविल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाज संतप्त झाला आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत रिलायन्स कंपनीच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठातील माधुरी हत्तीणीला जामनगरमधील वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे. या विरोधात सांगलीच्या मिरजमध्ये देखील आज जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. यावेळी आंदोलकांनी रिलायन्सच्या पोस्टर्स फाडून व त्यास जोडे मारुन अंबानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Madhuri Elephant
Bhandara District Bank Election : भंडारा जिल्हा बँकेवर महायुतीची एकहाती सत्ता; थांबविलेले सहा निकालही जाहीर

रिलायन्स नेटवर्कचे ७ हजार सिमकार्ड केले वर्ग 

वनतारा उद्यानात पाठविण्यात आलेल्या माधुरी हत्तीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात मिरज येथून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे, सुमारे ७ हजार मोबाईल सिमकार्ड रिलायन्स नेटवर्कमधून इतर कंपन्यांकडे वळवून समाजाने अंबानींना आर्थिक फटका दिला आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले.

Madhuri Elephant
KDMC : केडीएमसी ६५ बेकायदा इमारत प्रकरण; न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही, दाखल करणार अवमान याचिका

रिलायन्सची वस्तू खरेदी न करण्याचा ठराव 
आंदोलन करणाऱ्या जैन समाज बांधवानी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत समाजाच्या वतीने एक ठराव देखील करण्यात आला आहे. या ठरावानुसार आता रिलायन्स कंपनीची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही. यामुळे अंबानी समूहावर सामाजिकदृष्ट्या दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. यामुळे आगामी काळात माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जैन समाजाने लढा उभारला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com