Raigad Cyber Crime : डिलीटल अरेस्टची भीती दाखवून लुबाडणूक; रायगड पोलिसांनी ११ आरोपींना ठोकल्‍या बेड्या

Raigad News : डिजिटल अरेस्टच्या भीतीने गंडविण्याचे प्रमाण वाढले असून रायगडमध्ये एकाची ६६ लाखात फसवणूक करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील असा पहिलाच गुन्हा पोलिसात दाखल झाला होता
Raigad Cyber Crime
Raigad Cyber CrimeSaam tv
Published On

Summery

- रायगड पोलिसांनी ११ आरोपींना ठोकल्‍या बेड्या
- आरोपींमध्‍ये मोबाईल सर्व्‍हीस पुरवणाऱ्या कंपनीचे अधिकारी
-  6 हजारांहून अधिक सीमकार्ड, 35 मोबाईल, लॅपटॉप हस्‍तगत
- विदेशातील नागरिकांशी आरोपींचा संपर्क 


सचिन कदम 
रायगड
: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने लुबाडणूक करण्यात येत असते. यात डिजीटल अरेस्टची भीती दाखवून लोकांना लुबाडण्यात आल्याच्या घटना रायगडमध्ये मागील काही दिवसांपासून घडत आल्या आहेत. या प्रकरणांचा तपास करत रायगड पोलिसांच्या सायबर सेलने टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नेपाळसह देशाच्‍या विविध भागातून ११ आरोपींना बेड्या ठोकल्‍या आहेत.  

मागील काही दिवसात सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैसे लुबाडण्याचा येत असतात. यात रायगड जिल्‍ह्यातील एका वृद्धाला मनीलॉंड्रीग केसची भीती दाखवत त्‍याच्‍याकडून ६६ लाख रूपये उकळण्‍यात आले होते. या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला होता. हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा होता. या नंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. 

Raigad Cyber Crime
Madhuri Elephant : माधुरी हत्तीला गुजरातला हलविल्याचा निषेध; जैन समाजाकडून आंदोलन, रिलायन्स उत्पादनावर बहिष्काराचा केला ठराव

११२ बँक खाती गोठविली 

जिल्‍ह्यातील पहिल्‍याच दाखल गुन्‍ह्याचा तपास करताना सायबर पोलीसांच्‍या हाती आरोपी लागले आहेत. पोलीसांनी आरोपींकडून ३५ मोबाईल हँडसेट, ६ हजार १७५ सीमकार्ड, ३ लॅपटॉप, एक व्‍हीपीएन स्‍वीचपोर्ट, १ आयपॅड आणि ५ रबरस्‍टँप असा मुद्देमाल हस्‍तगत करण्यात आला आहे. तर या प्रकरणी आरोपींची ११२ बँक खाती गोठवण्‍यात आली आहेत.  

Raigad Cyber Crime
Pimpri Chinchwad Crime : ज्येष्ठ नागरिकाला बांधून बंगल्यात दरोडा; राजस्थानी दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विदेशातील नागरिकांशी संपर्क 

धक्कादायक म्हणजे आरोपी हे केवळ भारतच नव्‍हे तर पाकिस्तान, बांगलादेश, कॅनडा, नेपाळ, चीनमधील नागरीकांच्‍याही संपर्कात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तर महत्‍वाचे म्‍हणजे यात मोबाईल सर्व्हिस पुरवणाऱ्या एका कंपनीतील दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. रायगड पोलिसांच्या या यशस्वी तपासामुळे अशा प्रकारच्‍या देशविदेशातील अनेक गुन्‍ह्यांची उकल होण्‍यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com