Shreya Maskar
जिम वरून आल्यावर हेल्दी ॲपल मिल्कशेक बनवा.
ॲपल मिल्कशेक बनवण्यासाठी ॲपल, दूध, दालचिनी पावडर, साखर, बदाम, बर्फाचे तुकडे आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
ॲपल मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम ॲपल स्वच्छ धुवून साल काढून घ्या.
त्यानंतर सफरचंद बारीक कापून घ्या.
ब्लेंडरमध्ये दूध, साखर, किशमिश आणि सफरचंदाच्या फोडी टाकून मिक्स करून घ्या.
त्यानंतर यात उरलेले दूध आणि बर्फाचे तुकडे घालून ज्यूस बनवा.
पुढे मिल्कशेकमध्ये दालचीनी बारीक करून टाका.
तुम्ही यात कापलेले ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.