प्रसिद्ध अभिनेत्री लोकल ट्रेनमध्ये थिरकली
'लाल लाल कलरची बांगडी...' गाण्यावर केला भन्नाट डान्स
व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर संजू राठोडचे 'लाल लाल कलरची बांगडी...' हे गाणे तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेक डान्स रील बनवल्या जात आहे. मोठे असो वा लहान सर्वचजण या गाण्याचा आनंद घेत आहे. अनेक कलाकारांनी देखील या गाण्यावर भन्नाट डान्स रील बनवल्या आहेत. अशात आता टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर 'लाल लाल कलरची बांगडी...' गाण्यावर थिरकली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने चक्क मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हा भन्नाट डान्स केला आहे.
अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती 'लाल लाल कलरची बांगडी...' या गाण्यावर ट्रेनमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिच्या या रीलवर चाहते भरभरून कमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव करत आहे. ट्रेनचा संपूर्ण डबा रिकामी आहे. धनश्री गाण्याची हुक स्टेप्स करताना दिसत आहे. धनश्रीने निळ्या रंगाची शॉर्ट जीन्स आणि काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
धनश्री काडगावकर हा टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. तुला 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत झळकत आहे. मालिकेत तिने शर्वरी हे पात्र साकारले आहे. धनश्री आपल्या खलनायिकेच्या पात्रांसाठी ओळखली जाते. 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका दररोज रात्री 10:30 वाजता प्रसारित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.