Elvish Yadav SAAM TV
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav : एल्विश यादवविरोधात FIR; साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Elvish Yadav FIR Registered : बिग बॉसचा विजेता पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. एल्विश यादववर साक्षीदाराला धमकावल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस ओटीटी' विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. एल्विश हा एक युट्यूबर देखील आहे. अलिकडेच 'बिग बॉस 18' मध्ये रजत दलालची बाजू मांडताना पाहायला मिळाला. या आधी देखील सापाचे विष प्रकरणात प्रकरणांमुळे एल्विश चर्चेत होता. आता एल्विशवर एफआयआर दाखल केल्याची माहिती मिळत आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.

आता पीएफए ​​(पीपल फॉर ॲनिमल्स) कार्यकर्ते आणि रेव्ह पार्टी प्रकरणाचा साक्षीदार सौरभ गुप्ता यांनी एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल केला आहे. एल्विश यादववर साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गाझियाबादमधील नंदग्राम पोलिस ठाण्यात एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सौरभ यूट्यूबर एल्विश यादववर गंभीर आरोप करत म्हणाला की, "एल्विश यादव कारमध्ये त्याच्या सोसायटीत आला आणि त्याला धमक्या देऊ लागला."

मीडिया रिपोर्टनुसार, सौरभ गुप्ताचा भाऊ गौरव गुप्ताने नोव्हेंबर २०२३ मध्ये नोएडा येथे एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष दिल्याप्रकरणी यूट्यूबर एल्विश यादव विरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात सौरभ गुप्ता हा साक्षीदार आहे. आता हे प्रकरण वेगळे वळण घेत आहे.

सौरभने दिलेल्या माहितीनुसार, एल्विशने खोटी ओळख दाखवून सोसायटीत प्रवेश केला. तसेच एल्विश यादव त्याला आणि त्याच्या भावाला रस्ता अपघातात ठार करू शकतो, अशी धमकी देखील साक्षीदाराला देण्यात आली आहे. सौरभने एल्विश आणि त्याच्या पाठिंब्यात असणाऱ्या लोकांवर सौरभच्या कुटुंबाविषयी खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला आहे.

सौरभने दिलेल्या माहितीनुसार, असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात सौरभला, त्याचा भाऊ गौरव गुप्ता आणि नोएडा पोलीसांना एल्विशच्या विरोधात कट रचताना दाखवण्यात आले आहे. तेव्हापासून सौरभला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सौरभला त्याचे फेसबुक अकाऊंटही डीएक्टिवेट करावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT