Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, 'त्या' विधानावरून एफआयआर दाखल, अटक होणार?

Rahul Gandhi statement controversy over BJP and RSS: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSAAM TV
Published On

'भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देशातील प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे आता काँग्रेसची लढाई फक्त भाजप किंवा आरएसएस संघाशी नसून, इंडियन स्टेटशीही (भारतीय राज्य यंत्रणा)आहे', असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. मात्र, याच वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या विधानावरून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ जानेवारीला दिल्लीतील कोटला रोड येथे काँग्रेस पक्षाच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी राहुल गांधींनी एक विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि १९७ (१)डी अंतर्गत गुवाहाटी येथील पान बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Rahul Gandhi News
SIP investment benefits: २००० रुपयांची SIP करा आणि करोडपती व्हा; जाणून घ्या श्रीमंतीचा फॉर्म्युला, फक्त एका क्लिकवर

एफआयआर कुणी दाखल केला?

तक्रारदार मोनजीत चेतिया यांनी आरोप केला आहे की, 'राहुल गांधी यांनी भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणारे कृत्य केलं आहे. राहुल गांधी यांच्या विधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे'.

Rahul Gandhi News
Dhananjay Munde: 'मैं आईना हुं आईना दिखाऊंगा', अजित दादांसमोर धनंजय मुंडे फडाफडा बोलले..

तसेच 'राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून देशांत अशांतता आणि फुटीरतावादी भावना भडकू शकतात', असा दावा चेतिया यांनी केला. 'राहुल गांधी यांनी आपल्या विधानावरून आपला लढा भारतीय राज्यविरूद्ध असल्याचे सांगून, हे स्पष्ट होते की, त्यांना जाणूनबुजून जनतेमध्ये बंडखोरी भडकवायची आहे. त्यांचे हे वक्तव्य वारंवार निवडणूक अपयशामुळे झालेल्या निराशेचे परिणाम होते', असं चेतिया यांनी एफआयआरनुसार आपल्या तक्रारीत म्हटलंय.

'विरोधी पक्षनेता म्हणून लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी राहुल गांधी यांची आहे. परंतू त्यांनी खोटेपणा पसरवण्यासाठी आणि बंडखोरी भडकवण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आलं आहे', असं एफआयआरमध्ये त्यांनी नमूद केलं आहे.

राहुल गांधींविरोधात कारवाईची मागणी

'लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर, राहुल गांधी आता केंद्र सरकार आणि भारतीय राज्याविरूद्ध अंसतोष भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांचे वक्तव्य भारतीय राज्याच्या अंखडतेला आणि स्थिरतेला थेट आव्हान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर बीएनएसच्या कलम १५२ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी चेतिया यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com