SIP investment benefits: २००० रुपयांची SIP करा आणि करोडपती व्हा; जाणून घ्या श्रीमंतीचा फॉर्म्युला, फक्त एका क्लिकवर

SIP for long-term: आपल्याला टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवायचे असतील तर सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे एसआयपी. याचा अवलंब करून आपण २००० रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि २ कोटी रुपयांपर्यंतचा निधी तयार करू शकता.
SIP Investment Tips
Crorepati FormulaSaam TV
Published On

गुंतवणूकीचे अनेक पर्याय आहेत. ज्यात एसआयपी ही गुंतवणूक सोपी आणि लाभदायक मानली जाते. एसआयपी म्हणजे सिस्टी सिस्टीमॅटिक इंव्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. अनेकदा लोकांना वाटतं की, मोठी गुंतवणूक केल्यानेच माणूस करोडपती होऊ शकतो. पण आपण छोट्या गुंतवणुकीच्या पर्यायातून देखील मोठा फंड तयार करू शकता. यासाठी आपल्याला दीर्घकाळासाठी छोटी रक्कम गुंतवावी लागेल.

आपल्याला टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवायचे असतील तर सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे एसआयपी. याचा अवलंब करून आपण २००० रुपयांपासून सुरुवात करू शकता आणि २ कोटी रुपयांपर्यंतचा निधी तयार करू शकता. २५/२/५/३५ या सूत्राने आपण मोठी गुंतवणूक करू शकता. तसेच याचे परतावे आपल्याला अधिक मिळतील. पण याचे काही फायदे तसेच खबरदारी घेण्याची देखील गरजेचं आहे.

SIP Investment Tips
Dhananjay Munde: 'मैं आईना हुं आईना दिखाऊंगा', अजित दादांसमोर धनंजय मुंडे फडाफडा बोलले..

२५/२/५/३५ सूत्र काय आहे?

हा फॉर्म्युला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तयार करण्यात आला आहे.

25: वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.

2: दरमहा २००० रुपयांच्या एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)सह प्रारंभ करा.

5: तुमची एसआयपी रक्कम दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढवा.

35: ही प्रक्रिया सलग ३५ वर्षे सुरू ठेवा.

SIP Investment Tips
Crime News: शाळेत जाताना अल्पवयीन मुलीची वाट अडवली, लॉजवर घेऊन गेले अन्...

हे सूत्र कसे कार्य करते?

समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी २००० रुपयांची एसआयपी सुरू केली. पहिल्या वर्षी तुम्ही दरमहा २००० रुपये गुंतवणूक कराल. पुढील वर्षी ही रक्कम ५ टक्क्यांनी वाढवून २१०० रुपये केली जाईल. त्याचप्रमाणे, दरवर्षी एसआयपीची रक्कम ५ टक्क्यांनी वाढवत रहा. अशा प्रकारे तुम्ही ३५ वर्षांसाठी गुंतवणूक करा.

किती परतावा मिळेल?

या फॉर्म्युल्यानुसार, जर आपण ३५ वर्ष गुंतवणूक कराल तर तुम्ही ३५ वर्षात एकूण, २१,६७,६८० रुपयांची गुंतवणूक कराल. जर तुम्हाला सरासरी वार्षिक १३ टक्क्यांनी परतावा मिळत असेल तर, तुम्हाला १,७७,७१,५३२ व्याज मिळतील. म्हणजे एकूण रक्कम १,९९,३९,२२० रुपये, म्हणजेच अंदाजे २ कोटी गुंतवणुकीतून मिळतील.

फायदे आणि खबरदारी

लहान सुरुवात, मोठा नफा: २००० रुपये या छोट्या रकमेपासून सुरुवात करणे सोपे आहे.

चक्रवाढीची जादू : दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा पूर्ण फायदा होतो.

महागाई: १२ टक्के परतावा महागाई दरापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे तुमच्या बचतीचे मूल्य वाढते.

नियमितता महत्त्वाची: गुंतवणुकीत शिस्त आणि सातत्य ठेवा.

योग्य फंड निवडण्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. थोडी बचत आणि सातत्य ठेवल्याने, तुम्ही तुमच्या आयुष्यात करोडपती होण्यासाठी हे सूत्र अंमलात आणू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com