up accident
Accidentgoogle

Accident : नोएडा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

UP Accident: उत्तर प्रदेशातील नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण रस्ता अपघात झाला. एक्स्प्रेस वेवर उभ्या असलेल्या ट्रकला कार धडकली.
Published on

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसेबसे मृतदेह बाहेर काढले. पोलीस सध्या तपासात व्यस्त आहेत. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क पोलीस स्टेशन परिसरात सेक्टर-१४६ मेट्रो स्टेशनजवळ नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेवर एक ट्रक खराब झाला होता. मागून एक वेगवान कार आली आणि या ट्रकमध्ये घुसली. चालकाचा जागीच मृत्यू झाला. ४ जखमींना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात कारचे चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले. 

up accident
Visakhapatnam: 'ओके', गेले ३ खोके! नवरा-बायकोचं भांडण, रेल्वेला ३ कोटींचा भुर्दंड, कसं काय?

या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. २७ वर्षीय अमन सिंग, ६० वर्षीय देवी सिंह, त्यांची पत्नी राजकुमारी, विमलेश आणि कमलेश अशी मृतांची नावे आहेत.

up accident
BJP Leader Killing : भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; परिसरात एकच खळबळ

ओव्हरस्पीडिंग आणि वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. खराब पार्क केलेला ट्रक वेळीच हटवला असता तर अपघात टाळता आला असता. दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. सोबतच घटनास्थळी शांतता राखून आगाऊ कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Written By: Dhanshri Shintre.

up accident
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट, थरारक CCTV VIDEO आला समोर
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com