Visakhapatnam: 'ओके', गेले ३ खोके! नवरा-बायकोचं भांडण, रेल्वेला ३ कोटींचा भुर्दंड, कसं काय?

Visakhapatnam: विशाखापट्टणम येथे नवरा-बायकोचे भांडण घराबाहेर झाले आणि त्याचा फटका चक्क भारतीय रेल्वेला सहन करावा लागला आहे.
andhra pradesh
Visakhapatnamyandex
Published On

विशाखापट्टणम येथे नवरा-बायकोचे भांडण घराबाहेर झाले आणि त्याचा फटका चक्क भारतीय रेल्वेला सहन करावा लागला आहे. कारण दोघांच्या भांडणामुळे रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान झाले. यानंतर पतीला नोकरी गमवावी लागली म्हणजेच त्याला रेल्वेने निलंबित केले. नंतर प्रकरण गुंतागुंतीचे होत गेले. या सर्व प्रकारानंतर नवऱ्याने बायकोकडून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.

नेमके प्रकरण काय जाणून घ्या...

महिलेचा नवरा विशाखापट्टणममध्ये स्टेशन मास्तर आहे. दोघांचा विवाह १२ ऑक्टोवर २०११ रोजी झाला होता. परंतू त्यांचे नाते सुरळीत नव्हते. बायकोचे बाहेर दुसऱ्या कोणासोबत तरी अफेयर असल्याचे नवऱ्याचे असे म्हणणे होते. ती पतीसमोरच तिच्या प्रेमीसोबत बोलत होती. यामुळे दोघांमध्ये भांडण होत असत. नवरा आणि बायको दोघंही ड्युटीवर होते. ड्यूटीवर असताना दोघांमध्ये फोनवरून भांडण झाले. या़दरम्यान तेथून ट्रेन जाणार होती.

andhra pradesh
Viral Video: शेतकर्‍याला सलाम! लकी कारची अंत्ययात्रा काढली, स्क्रॅप करण्याऐवजी पुरले, व्हिडीओ व्हायरल

पतीच्या एका हातात ऑफिसचा फोन होता आणि दुसऱ्या हातात तो घरी बायकोशी बोलत होता. जास्त वाद नको म्हणून भांडण सुरू असताना पती तिला म्हणाला घरी ये, नंतर बोलू. यानंतर कॉल ठेवण्यासाठी'ठीक आहे' म्हणाला. ऑफिसच्या फोनवर दुसऱ्या स्टेशन मास्तरला वाटले की तो त्यांना ठीक आहे म्हणाला. त्यामुळे स्टेशन मास्तरने ट्रेन सोडण्याचा सिग्नल दिला आणि रेल्वेला बॅन रुटवर जाऊ दिले. यामुळे रेल्वेला मोठा झटका बसला. त्यामुळे रेल्वेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले.

andhra pradesh
Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरले! क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट, २१ जणांचा मृत्यू

पतीच्या एका हातात ऑफिसचा फोन होता आणि दुसऱ्या हातात तो घरी बायकोशी बोलत होता. जास्त वाद नको म्हणून भांडण सुरू असताना पती तिला म्हणाला घरी ये, नंतर बोलू. यानंतर कॉल ठेवण्यासाठी'ठीक आहे' म्हणाला. ऑफिसच्या फोनवर दुसऱ्या स्टेशन मास्तरला वाटले की तो त्यांना ठीक आहे म्हणाला. त्यामुळे स्टेशन मास्तरने ट्रेन सोडण्याचा सिग्नल दिला आणि रेल्वेला बॅन रुटवर जाऊ दिले. यामुळे रेल्वेला मोठा झटका बसला. त्यामुळे रेल्वेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Written By: Dhanshri Shintre.

andhra pradesh
Train Accident: पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात, एक्सप्रेसचे ४ डब्बे घसरले, अनेकजण जखमी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com