Secunderabad-Shalimar Superfast Express Derail Near Howrah : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरुन घसरल्यामुळे दुर्घटना घडली. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नालपूरजवळ हा रेल्वे अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधीही पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील नालपूर येथे सकाळी सकाळी रेल्वे अपघात झालाय. सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्सप्रेसचे (ट्रेन क्रमांक 22850 ) ४ डब्बे पटरीवरुन घसरलेत. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाल्याचं समजतेय. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे. हा अपघात कशामुळे झाला? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेचे अधिकारीही अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि बचाव पथकानी घटनास्थळावर धाम घेतली. प्रवाशांना वाचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. रेल्वेचेही मोठं नुकनास झालं नसल्याचंसमोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्सप्रेसचे इंजिन आणि ३ डब्बे रेल्वे पटरीवरुन घसरले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.