Huma Qureshi Boyfriend Rachit Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Huma Qureshi Boyfriend Rachit Singh : हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड रचित सिंह कोण? आलिया भट्ट ते विकी कौशलला दिले अभिनयाचे धडे

Who Is Rachit Singh? : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने रचित सिंहसोबत साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तर हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड रचित सिंह नेमका कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

हुमा कुरेशीने बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

रचित सिंहचे इंडस्ट्रीतील करिअर जाणून घेऊयात.

हुमा कुरेशी आणि रचित सिंह अनेक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत (Huma Qureshi Boyfriend Rachit Singh) गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. गायिका आकासा सिंगने पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र कलाकारांकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड रचित सिंह नेमका कोण? काय करतो ? हे जाणून घेऊयात.

रचित सिंहचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. तो 2012मध्ये नवी दिल्लीत आला. येथे त्याने रॅम्प मॉडेलिंगमध्ये काही काळ करिअर केले. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात संधी शोधण्यासाठी रचित सिंह 2016 ला मुंबईत आला. मीडिया रिपोर्टनुसार, रचित सिंहने करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनय मार्गदर्शक अतुल मोंगिया यांच्यासोबत काम केले. त्याने कलाकारांसाठी प्रशिक्षण व्यासपीठ असलेल्या आर्टिस्ट कलेक्टिव्हची स्थापना करण्यात मोंगियाला मदत केली. कालांतराने, त्याने या उपक्रमांतर्गत अनेक कलाकारांना प्रशिक्षण दिले. अनेक चित्रपट कार्यशाळांमध्येही भाग घेतला.

रचित सिंहने अभिनय प्रशिक्षक म्हणून इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रचित सिंहने 'वर्कशॉप' या त्याच्या कंपनीच्या माध्यमातून 100 हून अधिक प्रशिक्षण सत्रे आयोजित केली आहेत. आलिया भट्ट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा, गुलशन देवैया, इमाद शाह, कुणाल कपूर, पूजा हेगडे, हर्षवर्धन राणे, अमृता सुभाष, शहाना गोस्वामी, अहाना कुमरा, अनित पड्डा आणि शनाया कापोर या कलाकरांना रचित सिंहने अभिनयाचे धडे दिले आहे.

रचित सिंहने 'कर्मा कॉलिंग' या सीरिजमधून 2024 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यात त्याने वेदांग ही व्यक्तिरेखा साकारली. या शोमध्ये रवीना टंडन, वरुण सूद, नम्रता शेठ आणि विक्रमजीत विर्क हे कलाकार देखील पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT