Huma Qureshi Engaged With Rachit Singh?
Huma Qureshi EngagementSAAM TV

Huma Qureshi Engagement : हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा? होणारा नवरा कोण?

Huma Qureshi Engaged With Rachit Singh? : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तिचा होणारा नवरा कोण, जाणून घेऊयात.
Published on
Summary

हुमा कुरेशीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हुमा कुरेशी आणि रचित सिंहचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हुमा कुरेशी लवकरच 'जॉली एलएलबी 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ( Huma Qureshi Engagement ) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्याचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. हुमा कुरेशीचे नाव खूप वेळा पासून रचित सिंहसोबत (Rachit Singh) जोडले जात आहे. अशात आता साखरपुड्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हुमा कुरेशीने तिचा बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत साखरपुडा केला आहे. गायिका आकासा सिंगच्या सोशल मीडिया पोस्टवरून हुमा कुरेशी आणि रचित सिंहच्या नात्यांची चर्चा सुरू झाली आहे. गायिकेने त्यांच्यासोबत एक खास फोटो शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिले आहे. आकासा सिंगने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "क्युटीज...हुमा कुरेशी आणि रचित सिंह तुम्हाला खूप शुभेच्छा...(congratulations on your little piece of heaven) सर्वोत्कृष्ट नाव, हुमाएक चांगली रात्री... "

आकासा सिंगची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे हुमा कुरेशी आणि रचित सिंहने गुपचूप साखरपुडा केल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप अभिनेत्री हुमा कुरेशीकडून साखरपुड्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र चाहते सध्या त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. हुमा कुरेशी आणि रचित सिंह दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत. Bayaanसोबत तिच्या भव्य TIFF 2025 पदार्पणानंतर साखरपुड्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रचित सिंह कोण?

हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड रचित सिंह हा अभिनय प्रशिक्षक (ॲक्टिंग कोच) आहे. रचित सिंहने आजवर आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि विक्की कौशल यासारख्या मोठ्या कलाकारांना प्रशिक्षण दिले आहे. त्याने 'कर्मा कॉलिंग' या सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मार्च 2024 मध्ये शाहरुख खान आणि गौरी खानच्या पार्टीमध्ये हुमा आणि रचित एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.

हुमा कुरेशी वर्कफ्रंट

हुमा कुरेशी अलिकडेच 'मालिक' चित्रपटात झळकली होती. आता अभिनेत्री अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'जॉली एलएलबी 3'मध्ये दिसणार आहे. 'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Huma Qureshi Engaged With Rachit Singh?
Bigg Bossनं घरातील 2 सदस्यांना सुनावली कठोर शिक्षा, संपूर्ण सीझनसाठी केले नॉमिनेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com