Women's Day Special: छोट्या शहरातील तरुणीची भरारी; मॉडेलिंग क्षेत्रात घडवले करिअर

Buldhana Women's Day: शेगावसारख्या लहान शहरातील गायत्री रोहनकार हिने कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग स्पर्धेत यश मिळवत करिअर घडवले आहे.
Women's Day Special
Women's Day Specialsaam tv
Published On

मॉडलिंगची कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा मार्गदर्शन नसताना बुलढाण्याच्या शेगाव सारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहनकार या तरुणीने आपल्या जिद्द आणि मेहनतीने फॅशनच्या दुनियेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम स्पर्धेत यश मिळवून मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे.

शेगाव शहरातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गायत्री रोहनकार या तरुणीने पॉलिटेक्निक डिप्लोमा इन इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन पर्यंत आपलं शिक्षण घेतलं. या शिक्षणाच्या आधारावर तिला नोकरी मिळणे शक्य होते, मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याच तिने ठरवलं. गायत्रीला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती, मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सुविधा ह्या शेगाव सारख्या शहरांमध्ये उपलब्ध नसल्याने गायत्रीने स्वतःच्या मेहनतीने समाज माध्यमावर त्याची माहिती घेतली आणि विविध स्पर्धा लढवल्या. ज्यामध्ये त्यांना यश मिळाल्याने त्या पूर्ण आत्मविश्वासाने आता या स्पर्धांना सामोरे जात आहेत.

Women's Day Special
Maharashtra Politics: धसांच्या खोक्याला शिकारीचा नाद; खोक्याने मारले हरिण, काळवीट आणि मोर, पाहा स्पेशल रिपोर्ट

आजपर्यंत गायत्रीने मिस पॉप्युलर, मिस वीरांगणा, मिस महाराष्ट्र, मिस इंडिया, मिस इंडिया इंटरनॅशनल, असे विविध पुरस्कार पटकावले आहेत. मॉडलिंग क्षेत्रात काम करत असताना समाजाकडून तिला विविध अडचणींचा सामना देखील करावा लागल्याच गायत्री सांगते, मात्र तिच्या प्रत्येक निर्णय सोबत घरच्यांनी पाठीशी उभे राहून तिला साथ दिली त्यामुळे समाजाचा विचार न करता तिने या सर्व बाबींना सामोरे जात याच क्षेत्रात करिअर करण्याच ठरवलं.

Women's Day Special
Beed Marriage: ‘एका लग्नाची गोष्ट’, अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकास्पद काम

आता मिस एशिया युनिव्हर्स व्हायचं हे गायत्रीचे स्वप्न आहे, तर प्रत्येक महिलेत वेगवेगळे टॅलेंट असते ते हेरून त्यामध्येच आपण आपलं कौशल्य विकसित करावं, आणि त्यामध्येच आपल करिअर करावं. अडचणी येतील मात्र त्याला धीराने सामोरे गेल्यास नक्कीच यश मिळतं, असा सल्ला देखील महिला दिनाच्या निमित्ताने गायत्री इतर महिला मुलींना देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com