Elvish Yadav Saam Digital
मनोरंजन बातम्या

Who Is Elvish Yadav: बिग बॉस विजेता, कोट्यवधींची संपत्ती, तरीही केली सापाच्या विषाची तस्करी? कोण आहे 'एल्विश यादव'

Who Is Elvish Yadav: घरात पाच जिवंत कोब्रा आणि बंदी घालण्यात आलेले विष सापडल्यामुळे एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. एल्विशने या आरोपांचे खंडण केले असले तरी त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरात पाच जिवंत कोब्रा आणि बंदी घालण्यात आलेले विष सापडल्यामुळे एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. एल्विशने या आरोपांचे खंडण केले असले तरी त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विदेशी नागरिकांसोबत रेव पार्ट्या, पार्ट्यांना साप, विष पुरवत असल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत. या प्रकरणामुळे सध्या एल्विश देशभर चर्चेचा विषय बनलाय. दरम्यान वादात सापडलेला एल्विश नेमका कोण आहे आणि त्याची नेमकी इतकी क्रेझ का यावर एक नजर टाकूया.

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन धुमधडाक्यात संपन्न झाला. ५८ दिवस चाललेल्या या बिग बॉसच्या घरात एल्विशला वाईल्ड कार्डमधून एंट्री मिळाली होती. या सिझनमध्ये अभिषेक मल्हानपेक्षा अधिक मतं मिळवत एल्विशने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल. त्याला ट्रॉफीसह २५ लाखांचं बक्षीस मिळालं आणि इथूनच त्याच्या देशभर प्रसिद्धीला सुरुवात झाली. तसा तो एक यू ट्यूबर म्हणून प्रसिद्ध होताच मात्र, बिग बॉसने त्याला सेलिब्रेटी जगतात एक वेगळी ओळख मिळवून दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हरियानातील गुडगावमध्ये जन्म झालेल्या एल्विशने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली आहे.एल्विश एक प्रसिद्ध यू ट्यूबर आहे. एल्विश यादव व्लॉग आणि एल्विश यादव अशी दोन यू ट्यूब चॅनल तो चालवतो. इंस्टाग्रामवर त्याचे ७.४ मिलियन फॅन तर यूट्यूबवर १४.५ मिलियन सबस्क्रायबर आहेत. अवघ्या २५ व्या वर्षी तो एल्विश यादव फाऊंडेशन देखील चालवतो. तसा तो करोडोंच्या संपत्तीचा मालकही आहे. गुरुग्राम सारख्या शहरात १४ कोटींचे ४ मजली अलिशान घर आहे. जवळपास ५० कोटींची एकूण संपत्ती असल्याचा अंदाज आहे.

एल्विशची वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्ये त्याने एक ट्विट करत वाद ओढवून घेतला होता. घरी भांडी धुणाऱ्याची गरज आहे. सलमान खानच्या चाहत्यांसाठी आम्ही नोकरी आणि चांगला पगारही देऊ, असे ट्विट केल्यामुळे बराच वाद झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये फुलांच्या कुंड्या चोरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. यात चोरीसाठी वापरलेली लक्झरी कार एल्विशची असल्याचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान सध्या साप आणि विषाच्या तस्करीवरून अडचणीत सापडलेल्या एल्विशने गणेशोत्सवकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट दिल्याची चर्चा आहे. सुषमा अंधारे यांनी एल्विश आणि एकनाथ शिंदे यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एल्विश मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीची आरती करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT