Vivek Agnihotri  x
मनोरंजन बातम्या

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Vivek Agnihotri News : रोज वरण भात कोण खातं? मराठी पदार्थ, मराठी जेवण हे गरीबांचं जेवण आहे, असे वक्तव्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे.

Yash Shirke

  • विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत मराठी जेवणाला नावं ठेवली.

  • विवेक अग्निहोत्री यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • मराठी जेवणाला गरीबांचं जेवण म्हटल्याने त्यांना ट्रोल केले जात आहे.

Vivek Agnihotri Video : 'द बंगाल फाइल्स' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मुलाखतीदरम्यान त्यांनी मराठी खाद्यपदार्थांवर टीका केली. यावरुन विवेक अग्निहोत्रींनी नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्याशी लग्न केले आहे. मुलाखतीदरम्यान पल्लवी जोशी यांना 'लग्नानंतर जेव्हा तुम्ही घरी मराठी पद्धतीचे जेवण बनावायच्या तेव्हा विवेक यांची प्रतिक्रिया कशी होती? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना 'मराठी पदार्थांना ते (विवेक अग्निहोत्री) गरीबांचे जेवण म्हणायचे' असे पल्लवी जोशी यांनी म्हटले.

कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'पल्लवीने लग्नानंतर मला वरण-भात खाऊ घातला होता. मी म्हटलं, हे कसलं गरीबांचं जेवण आहे, यात तेल नाही, मसाला नाही.. मी दिल्लीचा आहे. त्यामुळे मला चिकन, मटण, कबाब असे तेलाचा थर असलेले पदार्थ खाण्याची सवय होती. वरणभात पण एकदम साधा... ही खाद्यसंस्कृती पाहून मला धक्का बसला होता. कोणाशी लग्न केलंय मी असा विचारही माझ्या मनात आला होता.'

विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मराठी खाद्यपदार्थ, मराठी खाद्यसंस्कृती यांना गरीबांचं जेवण म्हटल्याने विवेक अग्निहोत्री यांच्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. काही यूजर्सनी विवेक अग्निहोत्रींसह पल्लवी जोशी यांनाही ट्रोल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT