Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

Dhule Shirpur News : धुळ्याच्या शिरपूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात निषेधमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चादरम्यान एका पोलिसावर हल्ला झाला.
Police Attacked in Dule
Police Attacked in Dulesaam tv
Published On
Summary
  • धुळ्यातील शिरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळाले.

  • मोर्चादरम्यान पोलिस लाठीचार्ज झाला आणि त्याचवेळी पोलीस अधिकारी जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला.

  • हल्ल्यात अधिकारी गंभीर जखमी झाले असून, आंदोलकांनी आरोपीवर कठोर शिक्षा आणि फास्टट्रॅक खटल्याची मागणी केली आहे.

भूषण अहिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dhule : धुळ्यात स्वातंत्र्यदिनी भीषण घटना घडली होती. एका २८ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळ्याच्या शिरपूरमध्ये आदिवासी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या शिरपूरमध्ये आदिवासी संघटनांच्या सुरू असलेल्या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त मोर्चेकरांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. लाठीचारदरम्यान पोलीस अधिकारी जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झालेल्या हल्ल्यामुळे जयपाल हिरे गंभीररित्या जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. याच दरम्यान काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

Police Attacked in Dule
Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

शिरपूर येथे १५ ऑगस्ट रोजी २८ वर्षीय नराधमाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येत शिरपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. हाताला काळ्या फिती बांधून निषेधाचे फलक हातात घेत हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

Police Attacked in Dule
Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

या निषेध मोर्चाला शिरपूरचे आमदार काशीराम पावरा देखील हाताला काळ्या फिती बांधून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर शासन करण्यात यावे. त्याचसोबत हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे.

Police Attacked in Dule
Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com