Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

Maharashtra Political News : शिंदे गटामध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार आहेत. काँग्रेस, शिवसेना शिंदे गटानंतर पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
maharashtra politics
maharashtra politicsx
Published On
Summary
  • काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

  • शिंदेसेनेमध्ये मन न रमल्याने त्या पक्षातून बाहेर पडल्या होत्या.

  • हेमलता पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणात आहेत.

Maharashtra : काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या हेमलता पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हेमलता पाटील काँग्रेस पक्षामधून बाहेर पडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. पण त्या शिंदेसेनेमधून देखील बाहेर पडल्या. आता हेमलता पाटील राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हेमलता पाटील यांनी काँग्रेसकडून (महाविकास आघाडी) उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा संधी न मिळाल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुक लढवल्याची संधी न मिळाल्यामुळे माध्यमांशी संवाद साधताना त्यांना रडू देखील कोसळले होते. या नाराजीमुळे हेमलता पाटील यांनी पदांचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली.

maharashtra politics
Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

फेब्रुवारी २०२५ मध्ये काँग्रेसची साथ सोडल्यानंतर हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिंदे गटात गेल्यानंतरही पाटील यांचे मन रमत नव्हते. एक-दोन महिन्यांमध्ये त्यांनी शिंदे गटातूनही बाहेर पडण्याचे ठरवले. पक्षातून बाहेर पडताना सध्या कोणत्याच पक्षासाठी काम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

maharashtra politics
Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

शिंदेसेनेमधून बाहेर पडल्यानंतर चार महिन्यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये आता हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (१९ ऑगस्ट) मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हेमलता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.

maharashtra politics
१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com